वाशीम,
MahaDBT Farmers Scheme महाडीबीटी पोर्टल वर कृषी विभागामार्फत कृषी यांत्रिकीकरण, सिंचन साधने अशा विविध घटकांतर्गत शेतकर्यांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येतात. प्राप्त अर्जांमधून लकी ड्रॉ द्वारे लाभार्थी निवड याआधी घेतली जात होती. परंतु यात बदल करून शासनाने प्रथम येणार्यास प्रथम प्राधान्य तत्त्वावर वाशीम जिल्ह्यातील ३ हजार १५३ लाभार्थ्यांची निवड केली असून, त्यांना १२.६१ कोटी रुपयांचा लाभ दिला आहे.

सदर लाभार्थी निवडीची यादी डीबीटी पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. तसेच याबाबत निवड झालेल्या लाभार्थी शेतकर्यांना त्यांच्या भ्रमणध्वनी वर लघुसंदेश देखील पाठवण्यात आलेला आहे. निवड झालेल्या घटकांमध्ये कृषी यांत्रिकीकरण उपअभियान अंतर्गत १ हजार १७४ लाभार्थीना ५ कोटी ५८ लाखाचा लाभ, एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान मध्ये १६२ लाभाथीर्र्ना १ कोटी ४५ लाख, MahaDBT Farmers Scheme मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना (वैयक्तिक शेततळे) यामध्ये २५६ लाभाथीर्र्ना १५ कोटी ५५ लाख, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना- प्रती थेंब अधिक पीक (सूक्ष्म सिंचन घटक) मध्ये १ हजार ५५४ लाभार्थींना ३ कोटी ९९ लाख, आर के व्ही वाय शेततळ्याला प्लास्टिक आच्छादन मध्ये ७ लाभार्थींना ३ लाख ८४ हजार शेतकरी व अनुदान अंतर्भूत आहे.
ज्या शेतकर्यांची निवड झालेली आहे, अशा शेतकर्यांनी येत्या दहा दिवसात आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावयाची आहे. दहा दिवसात कागदपत्रांची पूर्तता न केल्यास अर्ज आपोआप रद्द होईल. कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर पात्र लाभार्थ्यांना लगेचच पूर्वसंमती मिळेल. MahaDBT Farmers Scheme महाडीबीटी पोर्टलवर फार्मर आयडीने लॉगिन केल्यास लाभार्थ्याला पुढील माहिती मिळू शकेल. ज्या शेतकर्यांनी फार्मर आयडी काढला नसेल त्यांनी लवकरात लवकर नजीकच्या सीएससी केंद्राकडून तो काढून घ्यावा, असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी संतोष वाळके यांनी केले आहे.