128 वर्षांच्या योगगुरू बाबा शिवानंदांचे निधन

04 May 2025 10:22:12
वाराणसी,
 
 
Baba Shivanand-Yoga Guru 21 मार्च 2022 रोजी राजधानीत 128 कर्तृत्त्ववान व्यक्तींना तत्कालिन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्या कार्यक्रमात अनवाणी आणि साध्या कपड्यांमध्ये आलेल्या बाबा शिवानंदांनी सगळ्यांचे लक्ष वेधले. त्यांनी वाकून राष्ट्रपती कोविंद यांना नमस्कार केला पण, राष्ट्रपतींनी वाकून त्यांना उठविले, हे विशेष! पद्मश्री पुरस्कार स्वीकारल्यानंतर, गुडघ्यावर बसून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अभिवादन करून आभार व्यक्त करणारे बाबा शिवानंद चर्चेचा विषय झाले. पंतप्रधान स्वत:ची खुर्ची सोडून उभे राहीले आणि बाबा शिवानंदांना वाकून नमस्कार केला. हे फोटो आणि व्हिडीओज व्हायरलही झाले होते.
 
 

Baba Shivanand-Yoga Guru 
  (संग्रहित)
 
Baba Shivanand-Yoga Guru असे हे योगगुरू आणि 128 वर्षे वय असलेल्या बाबा शिवानंद यांचे शनिवारी रात्री 9 वाजताच्या सुमारास निधन झाले आहे. ते गेल्या 3 दिवसांपासून बीएचयुमध्ये उपचार घेत होते. वाराणसीच्या हरिश्चंद्र घाटावर त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार केले जातील. त्यांच्या निधनाविषयी विविध क्षेत्रातील मान्यवर शोक व्यक्त करीत आहेत. त्यांनी आपले संपूर्ण जीवन योगसाधनेला समर्पित केेले होते. अतिशय साधे जीवन आणि आयुष्यभर ब्रम्हचर्य व्रताचे पालन करणारे बाबा शिवानंद यांना 21 मार्च 2022 रोजी पद्मश्री पुरस्काराने गौरवान्वित करण्यात आले होते. पद्मश्री मिळणारे ते सर्वाधिक वयाचे भारतीय आहेत, हे उल्लेखनीय!
 
 
 
Baba Shivanand-Yoga Guru-death
 (संग्रहित)
 
Baba Shivanand-Yoga Guru बाबा शिवानंद वाराणसीच्या भेलूपूर गावातील दुर्गाकुंड भागात आपल्या आश्रमात रहात असत. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांचे चाहते होते. त्यांचा जन्म 8 ऑगस्ट 1896 रोजी पश्चिम बंगालच्या श्रीहट्टी गावात भिक्षुकी करणाèया ब्राम्हण गोस्वामी कुटूंबात झाला होता. आज हे गाव बांग्लादेशात आहे. ते 4 वर्षांचे असताना, आईवडीलांनी त्यांना नवद्वीप निवासी बाबा ओंकारानंद गोस्वामी यांच्याकडे सोपविले होते. शिवानंद 6 वर्षांचे असताना, त्यांचे माता-पिता आणि बहिणीचा उपासमारीने मृत्यू झाला.
 
 
Baba Shivanand-Yoga Guru यानंतर, चिमुरड्या शिवानंदाने गुरूंच्या सान्निध्यात राहून आध्यात्माचे धडे घेतले आणि संन्यास घेतला. साधे जीवन, साधे जेवण आणि योगी व्यक्तीची जीवनशैली अवलंबिणारे शिवानंद, नियमितपणे मतदान करीत असत. यावर्षाच्या सुरुवातीला त्यांनी प्रयागराज महाकुंभात पवित्र संगमात स्नान केले होते. शतकोत्तरी वयानंतरही कठीणातील कठीण योगासने ते सहज करीत. महादेवाचे भक्त असलेल्या बाबा शिवानंदांचा दिनक्रम पहाटे 4 वाजता सुरू होत असे. ते नेहमी उकडलेल्या भाज्या खात आणि भात तर त्यांनी कधीच खाल्ला नाही. ते कधीच शाळेत गेले नाही पण, हिंदीसह इंग्रजीवर त्यांचे प्रभुत्व होते. ‘परमेश्वराच्या कृपेने मला कशाचीही आसक्ती नाही,’ असे ते नेहमी म्हणत.
Powered By Sangraha 9.0