दत्ता मेघे अभिमत विद्यापीठाचा उद्या दीक्षांत समारोह

04 May 2025 17:01:45
डॉ. प्रीती अदानी, डॉ. राजीव बोरले, डॉ. दातारकर यांना डीएस्सी मानद सन्मान
वर्धा,
Datta Meghe Abhimat University सावंगी मेघे येथील दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था अभिमत विद्यापीठाचा सोळावा दीक्षांत समारोह मंगळवार ६ रोजी दुपारी २ वाजता आयोजित करण्यात आला आहे. या समारोहाला भारताच्या सर्जन व्हाइस अ‍ॅडमिरल तथा सशस्त्र दल वैद्यकीय सेवेच्या पहिल्या महिला महासंचालक डॉ. आरती सरीन आणि अदानी फाउंडेशनच्या अध्यक्ष डॉ. प्रीती अदानी यांच्या उपस्थितीत विद्यापीठाचे कुलपती दत्ता मेघे स्नातक व स्नातकोत्तर विद्यार्थ्यांना पदवी व शैक्षणिक गुणवत्ता पुरस्कार प्रदान करतील.
 
 
Datta Meghe Abhimat University
 
सावंगी येथील विद्यापीठ सभागृहात आयोजित या समारोहात डॉ. प्रीती अदानी, दत्ता मेघे अभिमत विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. राजीव बोरले आणि नागपूरच्या शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अभय दातारकर यांना डॉटर ऑफ सायन्स या मानद पदवीने सन्मानित करण्यात येणार आहे. Datta Meghe Abhimat University मेघे अभिमत विद्यापीठातील विविध ज्ञानशाखेत देशविदेशातील विद्यार्थी शिक्षण घेत असून त्यातील विविध अभ्यासक्रमाच्या परीक्षांमध्ये गुणवत्ता प्राप्त करणार्‍या ८१ विद्यार्थ्यांना १२० सुवर्ण, ६ रौप्य तर १२ कुलपती विशेष पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
 
या दीक्षान्त समारोहाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार, कुलपती दत्ता मेघे राहणार असून विशेष अतिथी म्हणून डॉ. आरती सरीन, डॉ. प्रीती अदानी, डॉ. राजीव बोरले व डॉ. अभय दातारकर यांच्यासह प्रकुलपती डॉ. वेदप्रकाश मिश्रा, कुलगुरू डॉ. ललित वाघमारे, प्रकुलगुरू डॉ. गौरव मिश्रा, विद्यापीठाचे प्रधान सल्लागार सागर मेघे, Datta Meghe Abhimat University व्यवस्थापन मंडळ सदस्य डॉ. मंदार साने, आरती कुलकर्णी, अनिल पारेख, कार्यकारी संचालक डॉ. अनुप मरार, मुख्य समन्वयक डॉ. एस. एस. पटेल, डॉ. संदीप श्रीवास्तव, डॉ. तृप्ती वाघमारे, डॉ. जहीर काझी, कुलसचिव डॉ. श्वेता पिसूळकर, रवी मेघे, परीक्षा नियंत्रक डॉ. सुनीता वाघ, आदींची प्रमुख उपस्थिती राहील.
१ हजार ७२४ विद्यार्थ्यांना दिली जाणार दीक्षा
या दीक्षांत समारोहात १ हजार ७२४ विद्यार्थ्यांना दीक्षा दिली जाणार असून वैद्यकीय शाखेतील २३२ स्नातक व १६३ स्नातकोत्तर, दंतविज्ञान शाखेतील ८१ स्नातक व ३४ स्नातकोत्तर, Datta Meghe Abhimat University आयुर्वेद शाखेतील ५९ स्नातक व ३९ स्नातकोत्तर, भौतिकोपचार शाखेतील ५५ स्नातक व २२ स्नातकोत्तर, नर्सिंग शाखेतील ८० स्नातक, २७ स्नातकोत्तर व पदविका १०, याशिवाय औषध निर्माणशास्त्र, अभियांत्रिकी व तंत्रज्ञान, परावैद्यकीय शाखा आणि अन्य विद्याशाखेतील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. यावेळी ७३ पीएचडीप्राप्त आणि ३८ फेलोशिपप्राप्त विद्यार्थ्यांचाही गौरव करण्यात येणार आहे.
Powered By Sangraha 9.0