नागपूर,
Maharashtra Day महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून सोमलवाडा भाग पर्यावरण गतीविधी अंतर्गत सोनेगाव दुर्गा मंदिर परिसरातील गुरुवार आठवडी बाजारात सोनेगाव मित्र परीवार आणि दुर्गा मंदिर प्रभात शाखेच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरण प्रेमींना पक्षी जलपात्र वाटप करून त्यांना पशुसंवर्धन किती आवश्यक आहे याचे महत्त्व पटवून सांगितले. प्रत्येकाने आपापल्या घरी दाणा पाणी ठेवून पक्ष्यांची काळजी घ्यावी, जेणेकरून येत्या काळात सर्व प्रकारचे पक्षी अस्तित्वात राहतील.जलपात्रा सोबतच हरित घराची पत्रके वाटून त्यांना हरित घराची संकल्पना सांगण्यात आली. छोट्या छोट्या गोष्टी दररोजच्या जीवनात अंमलात आणून पाणी तसेच विजेची कशी बचत करता येते याविषयी माहिती देण्यात आली.
कार्यक्रमाला सोनेगाव दुर्गा मंदिर शाखेचे जयंत आंबेकर, श्रीधर दप्तरी, पर्यावरण तर्फे. नरेश हिवरखेडकर, सोनाली भालेराव, विवेक देशपांडे Maharashtra Day .सुरेश माताडे आणि सोनेगाव मित्र परिवाराचे सदस्य उपस्थित होते.या पर्यावरण पूरक उपक्रमाला त्यावेळी आठवडी बाजारात उपस्थित नागरिकांनी, भाजी विक्रेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
सौजन्य:हेमंत घरोटे,संपर्क मित्र