प्रातःस्वर - शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम

स्वराली संगीत संस्था आणि सुरसखी यांच्या संयुक्त विद्यमाने

    दिनांक :04-May-2025
Total Views |
नागपूर,
Swaraali Music Institute स्वराली संगीत संस्था आणि सुरसखी यांच्या संयुक्त विद्यमाने प्रातःस्वर हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आयोजित केला होता, सकाळचे राग मैफिलीत कमी ऐकायला मिळतात, आजच्या सभेत डॉ सानिका रुईकर यांनी वसंतमुखारी या रागाने मैफलीची सुरुवात केली, विलंबित एकताल मधील मालनिया गुंदला ही बंदिश गायकी अंगाने सुंदर रित्या सादर केली ,त्यानंतर छोटाख्याल आणि शेवटी मीरा बाईंचे भजन सादर केले, आकार युक्त ताना, गळ्याची फिरत ,सुंदररित्या राग सादर केला.
 
 
 

swar 
 
 
मैफिलीचा उत्तरार्ध वंदना देवधर यांच्या गायनाने रंगला, त्यांनी शुद्ध विभास हा अनवट राग सादर केला, ग्वाल्हेर घराण्याची गायकी त्यांच्या गायनात दिसून येत होती, Swaraali Music Institute अतिशय तयारीने ,चपळ तान, फिरत तान यांच्या सहाय्याने राग सुंदर रित्या पेश केला, त्यानंतर त्यांची खासियत असलेला गीत प्रकार म्हणजे टप्पा तयारीने पेश केला, हा गीतप्रकार फार कमी ऐकायला मिळतो, त्यानंतर तराणा गाऊन कार्यक्रमाची सांगता झाली समर्पक निवेदन अंजली पारनंदिवारयांनी समर्पक निवेदन केले.राम ढोक यांची तबल्यावर साथ तर संवादिनीवर सुमेधा वझलवार होत्या. एक उत्कृष्ट सूरमयी सकाळ अस या मैफिलीच वर्णन करता येईलअसेच उपक्रम सातत्याने व्हायला हवेत अशी श्रोत्यांची मागणी आहे. हा कार्यक्रम गिरीपेठ येथील नंदिनी सहस्त्रबुद्धे यांचे घरातील प्रांगणात  पहाटे ५.३० वाजता हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला
सौजन्य: आशिष नाईक,संपर्क मित्र