सेंट पॉल ज्युनिअर कॉलेजचा शंभर टक्के निकाल

05 May 2025 21:34:33
नागपूर,
St. Paul's Junior College हुडकेश्वर येथील सेंट पॉल ज्युनिअर कॉलेज, तसेच धामना येथील सेंट पॉल पब्लिक स्कुलचा इ. १२ वी विज्ञान शाखेचा निकाल १०० टक्के लागला आहे. यात प्रामुख्याने सफुरा खान या विद्यार्थिनी ९५ टक्के नागपूर बोर्डातुन प्रथम आली आहे. फेब्रुवारी /मार्च २०२५ मध्ये विज्ञान शाखेत २४०० विद्यार्थी परिक्षेला बसले होते. तर यातील ९५ टक्के गुण मिळविणारे १८७ विद्यार्थी तर ९०ते ८५टक्के गुण मिळविणारे ३९८ विद्यार्थी आहे.
 
 
St. Paul
 
विद्यार्थ्यांनी नियमितपणे अभ्यास करीत सराव परीक्षेला प्राधान्य दिले होते. त्यामुळेच सर्वोत्तम निकाल लागल्याची कबुली शाळेचे संचालक डॉ. टांकसाळे यांनी दिली. महाविद्यालयाच्या यशात प्रामुख्याने सर्व विद्यार्थ्यांसह शाळेच्या प्राचार्या देवांगणा पुंडे, विपिन टांकसाळे तसेच फार्मसी कॉलेजचे संचालक आदींचे योगदान आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देवून डॉ. राजाभाऊ टांकसाळे यांनी सत्कार केला. यात प्रामुख्याने अथर्व साकुरे ९२.६७ टक्के, अमन शाहु ९१.८३टक्के, तरुण कोंडे ९१.३३टक्के, अनन्या शिंदे ९१.१७ टक्के, मित ९१.१७ टक्के, विदित शिंदे ९१ टक्के, साहील येवळे ९०.८३ टक्के, हर्षदिप रॉय ९०.५०टक्के, परिधन्या ओक ९०.५० टक्के, हिमांशु तिवारी ९०.३३ टक्के, अद्वेत पानगावकर ९०.३३ टक्के, जाई श्रीखंडे, हर्ष घरोते ९०.१७टक्के, हर्षित सिन्हा ९० टक्के, निधी सेलुकर ९० टक्के, तनिष्क सेटा ९०टक्के, कौशिक जिभकाटे ९०टक्के, जान्हवी निनावे ९० टक्के, अश्वदिप ९०टक्के या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. सत्कार प्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा मंदा टांकसाळे, शाळेच्या मुख्याधपिका संगिता पिरके, पर्यवेक्षक जितेंद्र मुर्ते, विना पोहनकर, निलम मुर्ते, शिल्पा रेवतकर, सविता लोधीवाले, वैभव करडभाजने, यामिनी पंचभावे, अरविंद माल्के, नविन फुलझेले आदींनी विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल शुभेच्छा दिल्या.
Powered By Sangraha 9.0