बारावी नंतर काय? विद्यार्थ्यांसाठी करिअरच्या संधींचे ‘गोल्डन डोअर’ खुले!

कोणता कोर्स घ्यावा

    दिनांक :05-May-2025
Total Views |
नागपूर
after 12th बारावीचे निकाल नुकतेच लागले असून आता विद्यार्थ्यांसमोर मोठा प्रश्न उभा ठाकला आहे – पुढे काय? कोणता कोर्स घ्यावा, कोणत्या क्षेत्रात करिअर करावे, हे ठरवताना विद्यार्थ्यांप्रमाणे पालकांचीही चिंता वाढली आहे. विज्ञान, कला, वाणिज्य अशा सर्व शाखांतील विद्यार्थ्यांसाठी अनेक पर्याय खुले असून योग्य मार्गदर्शन घेतल्यास यशस्वी करिअर घडू शकते.
 
 

HSC Result 
विज्ञान शाखेसाठी करिअर पर्याय
 
 
इंजिनिअरिंग (B.E./B.Tech) – मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रॉनिक्स, आय.टी. वगैरे शाखांमध्ये संधी
वैद्यकीय (MBBS, BDS, BAMS, BHMS) – NEET परीक्षा आवश्यक
फार्मसी, बायोटेक्नॉलॉजी, अ‍ॅग्रीकल्चर – संशोधन व औद्योगिक क्षेत्रात संधी
B.Sc. (Pure Science) – रिसर्च, शिक्षण व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त
 
 
वाणिज्य शाखेसाठी करिअर पर्याय
 
 
B.Com., BBA, BMS – व्यवस्थापन, बँकिंग, फायनान्स क्षेत्रात करिअर
CA, CS, CMA – व्यावसायिक अभ्यासक्रम, उच्च वेतनाची संधी
MBA (पुढे जाऊन) – कॉर्पोरेट व व्यवसाय क्षेत्रासाठी
 
 
कला शाखेसाठी करिअर पर्याय
 
 
BA (इतिहास, समाजशास्त्र, मानसशास्त्र, पत्रकारिता) – UPSC, MPSC सारख्या स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त
Mass Communication, Fine Arts, Fashion Designing – सर्जनशील क्षेत्रात संधी
Law (LLB) – न्यायव्यवस्था व कॉर्पोरेट कायदेतज्ज्ञ
 
 
नव्या क्षेत्रात संधी
 
 
Data Science, Artificial Intelligence, Cyber Security – तांत्रिक क्षेत्रात मोठी मागणी
Hotel Management, Event Management, Travel & Tourism – सेवाक्षेत्रासाठी आकर्षक पर्याय
Animation, Gaming, Digital Marketing – सर्जनशील व डिजिटल क्षेत्रातील वाढती मागणी
मार्गदर्शन आवश्यक
 
 
विशेषत: ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी अनुभवी मार्गदर्शकांचा सल्ला घ्यावा. कोर्स निवडताना केवळ ट्रेंड नव्हे, तर स्वत:ची आवड, कौशल्ये आणि भविष्यातील संधी लक्षात घेऊन निर्णय घ्यावा, असे तज्ज्ञांचे मत आहे.