केंद्रीय वित्त आयोगासोबत माजी नगराध्यक्ष तराळे यांना दुसर्‍यांदा संधी

    दिनांक :06-May-2025
Total Views |
वर्धा,
Atul Tarale : सोळाव्या केंद्रीय वित्त आयोगापुढे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये येणार्‍या अडचणी आणि भविष्यातील तरतुदींचा सखोल अभ्यास करून त्याचे सादरीकरण करण्यासाठी महाराष्ट्रातील मोजक्या नगराध्यक्षांमध्ये वर्धा नगर पालिकेचे माजी अध्यक्ष अतुल तराळे यांना निमंत्रित करण्यात आले आहे. ८ मे रोजी सह्यांद्री अतिथीगृह येथे तराळे यांना सादरीकरण करायचे असल्याचे पत्र राज्याच्या नगरविकास मंत्रालयाकडून तराळे यांना प्राप्त झाले आहे. ते नगराध्यक्ष असतानाही त्यांना पंधराव्या वित्त आयोगापुढे शिफारसीचे सादरीकरण करण्याची संधी देण्यात आली होती.
 
 
 
 
tarale
 
 
 
केंद्र सरकारच्या ३१ डिसेंबर २०२३ च्या अधिसूचनेन्वये १६ व्या केंद्रीय वित्त आयोगाची स्थापना करण्यात आली. १६ व्या केंद्रीय वित्त आयोगाची समिती ८ व ९ मे रोजी राज्याच्या दौर्‍यावर येत आहे. दरम्यान, ८ रोजी सह्यांद्री अतिथीगृह येथे नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या लोकप्रतिनिधींसोबत बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांचे, उपक्रमांचे लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकार्‍यांना आयोगापुढे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काम करताना येणार्‍या अडचणी आणि भविष्यात उद्भवणारे प्रश्न यावर मत मांडावे लागणार आहे.
 
 
या समितीती राज्यातील १० माजी नगराध्यक्षांमध्ये वर्धेचे माजी नगराध्यक्ष अतुल तराळे यांची निवड करण्यात आली आहे. त्यांनी वर्धेचा केलेला विकासावर त्यांना आपले सादरीकरण करावे लागणार आहे. आपण नगराध्यक्ष असतानाही १५ व्या केंद्रीय वित्त आयोगापुढे मत मांडण्याची संधी देण्यात आली होती. त्यावेळी अभ्यासाअंति १५ सुचना दिल्या होत्या. त्यापैकी ७ सुचना घेण्यात आल्या असल्याची माहिती माजी नगराध्यक्ष अतुल तराळे यांनी दिली. विदर्भातील नागपूर, अकोला, चंद्रपूर महानगर पालिकेचे महापौर, अंजनगाव जि. अमरावती, लाखांदर जि. भंडारा व मनोरा जि. वाशिम या चार नगर पालिकांमध्ये वर्धेचे तराळे यांना निमंत्रित करण्यात आले आहे. नगराध्यक्ष काळात आपल्याला समाजाभिमुख काम करताना आलेल्या अडचणी व त्यावर उपाय याचे आपण सादरीकरण करणार असल्याचे तराळे यांनी सांगितले.