वर्धा,
Pankaj Bhoyar : भाजपामध्ये प्रत्येक कार्यकर्त्याच्या कार्याची दखल घेतली जाते. पक्षाकडून अनेक कार्यक्रम देण्यात येतात. आजपर्यंत आपण केलेल्या मेहनतीच्या जोरावर पक्षाला यश गाठता आले. यापुढे देखील आपणाला प्रचंड मेहनत घ्यावी लागेल. पक्षाने सोपविलेल्या कामाचे योग्य नियोजन, ज्येष्ठ पदाधिकार्यांचा सल्ला व टिम वर्कने कार्य केले तर कोणतेही कार्य सोपे होईल व त्यात आपल्याला भरघोस यश मिळेल, असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी केले.
नवनियुक्त मंडळ अध्यक्षांचा सत्कार, चर्चा व त्यांच्या समस्या जाणण्यासाठी आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री डॉ. पंकज भोयर बोलत होते. याप्रसंगी माजी खासदार रामदास तडस, जिल्हाध्यक्ष सुनील गफाट, महामंत्री अर्चना वानखेडे, सेलूचे माजी तालुका अध्यक्ष अशोक कलोडे, माजी शहर अध्यक्ष निलेश पोहेकर, राहुल चोपडा उपस्थित होते.
पालकमंत्री डॉ. भोयर पुढे म्हणाले की, नवनियुक्त पदाधिकार्यांनी जनतेच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी. आपण आजवर केलेल्या कार्यामुळेच पक्षाला यश मिळाले आहे. भविष्यात देखील पक्षाला यापेक्षा चांगले यश मिळावे, यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन त्यांनी केले.
कोणताही पक्ष कार्यकर्त्याशिवाय पुढे जावू शकत नाही. त्याच्या ताकदी व मेहनतीमुळे पक्षाला उभारी मिळत असते. भाजपामध्ये कार्यकर्ताला मानाचे स्थान देण्यात आले आहे. पक्षात घराणेशाही नसल्याने सर्वसामान्य कुटुंबातील सदस्य पक्षात मोठा होऊ शकतो. त्यासाठी आपले कार्य महत्वाचे आहे. येत्या काळात जिप, पंस व नपच्या निवडणुका होणार आहे. त्यासाठी जोमाने कार्य करा. अनेक वर्षानंतर डॉ. पंकज भोयर यांच्या रूपाने जिल्ह्याला पालकमंत्री पद मिळाले आहे. आपलेच पालकमंत्री असल्याने जनेतचे प्रश्न व समस्या तातडीने सोडविल्या जाऊ शकतात. आपली मागणी ते मुख्यमंत्री फडणवीस यांच्यापर्यंत पोहचू शकतात. त्यामुळे आपली देखील जबाबदारी वाढली असल्याचे तडस म्हणाले. संचालन राहुल चोपडा यांनी केले.
याप्रसंगी वर्धा शहरचे नवनियुक्त अध्यक्ष : निलेश किटे, सावंगी-सिंदी मेघे : सचिन चन्ने, पवनार : नितीन कवाडे, देवळी : उमेश कामडी, देवळी ग्रामीणचे : स्वप्नील खडसे, पुलगाव : प्रशांत इंगोले, नाचनगाव : जयश्री मोकदम, सेवाग्राम : नंदकिशोर झोटिंग, हिंगणघाट : भूषण पिसे, सेलू : प्रफुल्ल खोडे, कानगाव : राजू किटकुले, आर्वी : राहुल गोडबोले, आर्वी ग्रामीणचे राजेंद्र ठाकरे, आष्टी : सचिन होले, कारंजा : चक्रधर डोंगरे, हिंगणघाट ग्रामीण : विनोद विटाळे, समुद्रपूर : शेषराव तुळणकर, समुद्रपूर ग्रामीण मंडळाचे ÷अध्यक्ष हेमंत राऊत यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला गिरीष कांबळे, अशोक विजयकर, आशिष कुचेवार, बंटी वैद्य यांच्या सह पदाधिकारी उपस्थित होते.