प्रफुल्ल व्यास
वर्धा,
Dr. Preeti Gautam Adani विदर्भाचे ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांच्या भोवती नेहमीच एक आकर्षणाचे वर्तुळ असते. सढळ हाताने देण्याची आवड असल्याने त्यांच्या हातून हजारो घडले आणि पायावर उभे झाले. त्यांनी रुग्णसेवेच्या लावलेल्या छोट्या रोपट्याचा आता महाकाय वृक्ष झाला. रुग्णालयाला जोडून अभिमत विद्यापीठही तयार झाले. त्या विद्यापिठाचा आज ६ रोजी दीक्षांत समारंभ होता. देशातील दिग्गजांच्या यादीत असलेल्या गौतम अदानी यांच्या पत्नी व अदानी फाऊडेनशच्या अध्यक्ष डॉ. प्रीती आणि भारताच्या सर्जन व्हाईस अॅडमिरल तथा सशस्त्र दल वैद्यकीय सेवेच्या पहिल्या महिला महासंचालक डॉ. आरती सरीन या दोन महिला उपस्थित होत्या. पदक घेण्यासाठी आलेल्या प्रत्येकाला शेकहॅण्ड घेत शुभेच्छा देत असताना गुणवंतांना देण्यात येणारे गठ्ठ्यातील पदकांची वाटणी करण्याची महत्त्वाची भूमिका डॉ. प्रीती अदानी यांनी बजावली.
भारतातील अदानी आणि अंबानी हे दोन परिवार देश विदेशात सुपरिचित आहेत. ते त्यांच्या उद्योग व्यवसाय, श्रीमंती आणि सामाजिक दायित्वाने! आजच्या कार्यक्रमाला ज्यांच्या घरी हत्ती दिमतीला राहू शकतो अशा गौमत अदानी यांच्या पत्नी डॉ. प्रीती उपस्थित होत्या. नागपुरातून नियमित सुरक्षेच्या ताफ्यात आलेल्या पण कार्यक्रमस्थळी उतरल्यावर कोणताही बडेजाव नसलेल्या डॉ. प्रीती अदानी यांच्या हस्ते आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयातील कान, नाक, घसा रोगाच्या बाह्यरुग्ण विभागाचे उद्घाटन करण्यात आला. यावेळी या देशातील नामांकीत परिवारातील महिलेचा साधेपणा अनुभवना आल्याची सहज प्रतिक्रिया विशेष कार्य अधिकारी संजय इंगळे तिगावकर यांनी दिली. या दीक्षांत समारंभात डॉ. प्रीती यांना डॉक्टर ऑफ द सायन्स या मानद पदवीने सन्मानीत करण्यात आले. त्यानंतर विद्यापिठातील गुणवंत विद्यार्थ्यांना सुवर्ण, रजत पदकांनी या मान्यवरांच्या हस्ते सन्मानीत करण्यात आले. एका विद्यार्थिनीने १५ सुवर्ण पदकं पटकावले.Dr. Preeti Gautam Adani तिच्या ‘सुवर्ण’ पदकांचा गठ्ठा आला. त्या पदकांची गुंतागुंत झाली होती. अदानींच्या बंगल्यात कदाचित इकडाचा चमचा तिकडे करण्याचीही गरज न पडलेल्या डॉ. प्रीती यांनी स्वत: त्या पदकांची गुंतागुंत सोडवत अर्धे सुवर्ण पदकं डॉ. आरती सरीन यांच्या हाती दिले. (अदानींकडे सर्व वस्तू हाती देण्यासाठी माणसं असू शकतात.)
डॉ. सरीन यांनीही गुणवंतांना पदकं घालताना विद्यार्थ्यांची टोपी हलल्यानंतर ती सरळ करण्यातही मागेपुढे बघितले नाही. दोन उच्च पदस्य महिलांचा असाही मातृत्वाचा अनुभव दत्ता मेघे सभागृहाने अनुभवला. गेल्या १६ वर्षांपासुन होत असलेल्या या दीक्षांत सभारंभात पहिल्यांदाच दोन महिला एकाच वेळी आल्याचीही पहिलीच वेळ होती. विशेष म्हणजे एकाच मान्यवराची एकाच कार्यक्रमात दोन भाषणंही अदानी यांच्यामुळे अनुभवता आले. पहिले सन्मालाला उत्तर आणि दुसरे भाषण प्रमुख अतिथींचे होते. यापुर्वी श्रीलंकेच्या महिला आरोग्यमंत्र्यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली आहे.