२.३७ लाख राशन लाभार्थ्यांची ई केवायसी बाकी

धान्य होणार बंद ?

    दिनांक :06-May-2025
Total Views |
वाशीम, 
E-KYC of ration अंत्योदय आाणि प्राधान्य कुटूंब गटातील ७ लाख ९२ हजार ७९५ सदस्यांचे केवायसी पूर्ण झाली असली तरी अद्यापही वाशीम जिल्ह्यातील जवळपास २.३७ लाख लाभार्थी ई केवायसी पासून दूरच आहेत. यामध्ये कारंजा तालुयात सर्वात जास्त तर मानोरा तालुयात केवायसीचे प्रमाण इतर तालुयाच्या दृष्टीकोणातून कमी आहे.
 

राशन  
 
जिल्ह्यात रास्त भाव दुकानामधून अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटूंबातील लाभार्थ्यांना अन्नधान्याचे वितरण करण्यात येते. या लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण ई केवायसी अनिवार्य आहे, असे असतांना वाशीम जिल्ह्यातील वाशीम तालुयातील ४१ हजार ०४, रिसोड तालुयातील ४३ हजार ५८२, मानोरा तालुयातील ३० हजार ७४०, मंगरुळपीर तालुयातील ३६ हजार ७४०, माालेगाव तालुयातील ४० हजार ४५१ व कारंजा तालुयातील ४४ हजार ९४९ जणांची ई केवायसी अद्यापही दूर असल्यामुळे राशनच्या धान्यावर टांगती तलवार आहे.E-KYC of ration राशन कार्ड धारकावरील सदस्याची ई केवायसी करण्यासाठी मेरा हे अ‍ॅप विकसीत करण्यात आले आहे. या अ‍ॅप च्या मदतीने तसेच राशन दुकानदाराकडे जावून ई केवायसी करता येते. असे असतांनाही वाशीम जिल्ह्यातील १० लाख ३० हजार ३६१ लाभार्थ्यापैकी ७ लाख ९२ हजार ७९५ जणांनी ई केवायसी पूर्ण झाली असून, २ लाख ३७ हजार ५६६ जणांची ई केवायसी अद्यापही बाकी आहे.