जातनिहाय जनगणनेसाठीच्या संघर्षाचा सन्मान

आ.परिणय फुके यांचा ओबीसी महासंघातर्फे सत्कार

    दिनांक :06-May-2025
Total Views |
नागपूर,
MLA Parinay Fuke देशात ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला असून केंद्र सरकारने जातनिहाय जनगणनेसाठी मंजुरी दिली आहे. निर्णयामागे गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने लढा देणार्‍या नेत्यांचा मोलाचा वाटा आहे. यामध्ये आ.डॉ. परिणय फुके यांनी सातत्याने पाठपुरावा करत लढ्याला दिशा दिली. त्यांच्या या कार्याची दखल घेत राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत जातनिहाय जनगणना करण्याचा ऐतिहासिक घेण्यात आला.
 

parinay fuke 
 
यानंतर ओबीसी समाजात आनंदाचे व समाधानाचे वातावरण आहे.या निर्णयानंतर आमदार डॉ. फुके यांच्या हिलटॉप, येथील निवासस्थानी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांच्या नेतृत्वात सत्कार करण्यात आला. यावेळी आ. फुके म्हणाले, जनगणना ही केवळ माहिती संकलनाची प्रक्रिया नसून, ती सामाजिक न्याय, हक्कांची पुनर्स्थापना आणि समतेच्या तत्वांची खरी आहे. या निर्णयामुळे ओबीसी समाजाला योजनांचा खरा लाभ मिळवून देणे शक्य होईल. माझा सत्कार म्हणजे ओबीसी समाजाच्या दीर्घ संघर्षाचा गौरव आहे. या लढ्याचा मी एक भाग होतो, ही माझ्यासाठी गौरवाची बाब आहे. याप्रसंगी महासंघाचे शरद वानखडे, परमेश्वर राऊत, विनोद इंगोले, गुनेश्वर आरीकर, राहुल करांगळे, अनिल चानपूरकर, लीलाधर दाभे, वीरश्री आदी उपस्थित होते.