सर्वसामान्य नागरिकांना कळलं आहे का?

06 May 2025 16:09:02
नागपूर,
PMG Layout Narendranagar पी.एम.जी. ले आऊट नरेंद्रनगर येथील श्री सिद्धिविनायक गणेश मंदिर अतिशय सुंदर आहे या मंदिराच्या लगतच नागपूर महानगर पालिकेने सुंदर बगीचा करून दिलेला आहे. सर्वसामान्यांकरीता ग्रीन जीमची व्यवस्था करून दिलेली आहे.यामागील हेतू हाच की या परिसरातील वातावरण आध्यात्मिक, भक्तीमय व आरोग्य सदृढ, निरोगी राहावे.
 
 

nala 
 
 
 
 
या बगीच्याच्या पूर्वेकडील बाजूने एक नाला वाहत असतो व या नाल्याचा नागरिकांना त्रास होवू नये म्हणून उंच व मोठ्ठी भिंत महानगर पालिकेने बांधलेली आहे, PMG Layout Narendranagar  नाल्यातील सांडपाणी निरंतर वाहतं राहावं म्हणून स्वच्छता केलेली आहे. या परिसरातील नागरिक, नाल्याच्या पूर्वेकडील असलेल्या वस्तीतील नागरिक या नाल्यामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात कचरा टाकत असल्याचे निदर्शनास आलेले आहे. नाल्यातील पाणी वाहत नसून एका जागी साचलेले आहे यामुळे परिसरात दुर्गंधी, वातावरण अशुध्द आहे, विशेषतः रात्रीच्या वेळी याचा फार त्रास जाणवतो,मच्छर वाढलेले आहे व याचा त्रास सहन करावा लागतो, याचाही विचार नागरिकांनी करणे गरजचे आहे.
सौजन्य :संजय श्रोत्री,संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0