बालरंजन संस्कार शिबिराचा समारोप

06 May 2025 15:33:22
नागपूर ,
Pandit Bachharaj Vyas School पंडित बच्छाराज व्यास शाळा येथील इंग्रजी माध्यम विभागात सुरू असलेल्या बालरंजन संस्कार शिबिराचा समारोप शाळेच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. गेल्या १५ दिवसांपासून सूरू असलेल्या या बालरंजन संस्कार शिबिरात विद्यार्थ्यांना ध्यानधारणा, 'आर्ट आणि क्राफ्ट', आजच्या स्पर्धेच्या युगात वावरताना स्वतःचे संरक्षण कसे करावे या साठी म्हणून लाठीकाठीचे प्रशिक्षण देण्यात आले.तसेच वेगवेगळ्या विषयावर प्रतिष्ठित व्यक्तीचे मार्गदर्शन देखील करण्यात आले.समारोप कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून भारतीय शिक्षण संस्थेचे सचिव उपेंद्र जोशी व भारतीय शिक्षण मंडळाच्या सहसचिव . ऋचा हळदे तसेच शाळेचे मुख्याध्यापक अनिरुद्ध टेंभेकर उपस्थित होते.
 
 

mko 
 
 
 
मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.Pandit Bachharaj Vyas School या नंतर शिबिरार्थिनी लाठीकाठीचे प्रात्यक्षिक सादर केले. तसेच संस्कृत गीत, इंग्लिश ड्रामा,विद्यार्थ्यांना शिबिर कसे वाटले ते शिबिरात काय शिकले या विषयी विद्यार्थ्यांनी अनुभव कथन केले.या वेळी विद्यार्थ्यांनी सामूहिक गीत सादर केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक अनिरुद्ध टेंभेकर यांनी केले.आपल्या अध्यक्षीय भाषणात ॲड.उपेंद्र जोशी म्हणाले की असे शिबिराचे आयोजन करणे आज काळाची गरज झालेली आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैदेही वैद्य यांनी केले तर आभार प्रदर्शन रोहिणी जोशी यांनी केले.
सौजन्य: रोहिणी जोशी, संपर्क मित्र 
Powered By Sangraha 9.0