रेल्वेतून गांजा तस्करी करणार्‍या दोघांना अटक

    दिनांक :06-May-2025
Total Views |
नागपूर,
Ganja smuggling : मध्यवर्ती नागपूर रेल्वेस्थानकावर सुरक्षा बलातर्फे रेल्वेगाडीतून गांजा तस्करी करणार्‍या दोघांना अटक करण्यात आली. आरोपीकडून ५ हजार ९८० रुपयांचा गांजाही जप्त करण्यात आला. आरपीएफला गाडी क्रमांक १२६१६ नवी दिल्ली-चेन्नई ग्रॅण्ड ट्रॅक एक्स्प्रेसमधून गांजा तस्करी होत असल्याची माहिती मिळाली.
 
 
ngp
 
गाडी नागपूर स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक-३ वरील दाखल झाली. गाडीतून उतरलेल्या दोन संशयित व्यक्तींना उपनिरीक्षक शिवराम सहाय्यक उपनिरिक्षक अश्विन पवार, राठोड आणि सीआयबी पथकाने ताब्यात घेतल. त्यांच्याकडील साहित्याची तपासणी केली असता त्यामध्ये ५ हजार ९८० रुपयाचा गांजा मिळाला. प्राथमिक चौकशीत आरोपींनी गांजा पांढुर्णा येथून घेऊन दक्षिण भारतात गरजू लोकांना विक्रीसाठी नेण्यात येत असल्याचे सांगितले. रेल्वेगाडीतून मादक पदार्थांची अवैध वाहतूक करणे हा गंभीर गुन्हा आहे. त्यामुळे दोन्ही आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहिता तसेच सुरक्षा आणि मानक अधिनियम २००६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आणि यांच्याकडील गांजाही जप्त करण्यात आला. पुढील कायदेशीर कारवाईसाठी दोन्ही आरोपींना नागपूर लोहमार्ग पोलिसांच्या स्वाधिन करण्यात आले.