सामुहिक उपनयन संस्कार सोहळा साजरा

    दिनांक :06-May-2025
Total Views |
नागपूर,
Santaji Auditorium Nagpur पाराशर ब्राह्मण हितसंवर्धक बहुउद्देशीय संस्था व पाराशर ब्राह्मण मंडळ नागपूरच्या संयुक्त विद्यमाने विदर्भस्तरीय सामुहिक उपनयन संस्कार सोहळा संताजी सभागृह येथे उत्साहात संपन्न झाला.संस्थेच्या वतीने सामुहिक उपनयन संस्काराचे हे द्वितीय वर्ष होते. सर्वप्रथम समाजाचे आराध्य दैवत भगवान श्री परशुराम पूजन व दिप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर वेदब्राह्मणांच्या सानिध्यात मंत्रोच्चाराद्वारा विधीपूर्वक ३० बटूंवर उपनयन संस्कार करण्यात आले. विनियोग मंत्राचे पालन आणि ब्रह्मचर्य शिकवून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. गायत्री मंत्राची दीक्षा घेतल्यानंतर, बटूंनी भिक्षा घेतली आणि ती गुरूंना अर्पण केली. यानंतर गुरूंनी त्याच्या कानात गुरुमंत्र दिला. यावेळी बटुंनी यज्ञोपवित घालून काशी परंपरेचे पालन करण्याचा संकल्प केला.
 
 
batu 
 
 अशाप्रकारच्या सामुहिक आयोजनामुळे समाजातील लोकांचा वेळ आणि पैसा दोन्हीची बचत होते. समाजापुढे एक आदर्श निर्माण करण्याच्या दृष्टीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.Santaji Auditorium Nagpur या उपनयन संस्कारामध्ये अनिरुद्ध अनिवाळ, सिद्धेश अनिवाळ, अर्चित चौधरी, अन्वय आबदेव, राघव चौधरी, आरोह चौधरी, मयंक भोकरे, अद्वय माहोरे, धवल माहोरे, तनय माहोरे, शिवम पाठक, सक्षम पाठक, सोहम अलोणे, शांतनू तांबोळी, आरूष माहोरे, शुभम भागवत, सोहम सांडे, वेदांत भाबडे, सुजल भागवत, सार्थक भुसारी, यश मोरे, अमेय पाठक, सार्थक गुळकरी, हर्ष नाईक, प्रांजल पेठकर, अश्विन जोशी, हेमंत कमलाकर, श्रेयश डकारे, श्लोक साखरभाटे, सार्थक मुलमुले आदी बटूंचा सहभाग होता. यावेळी उपस्थित बटूंच्या पालकांनी संस्थेच्या उपक्रमाचे कौतुक केले.
सौजन्य: अरविंद पाठक,संपर्क मित्र.