तात्या टोपे नगर येथे संस्कार वर्ग

    दिनांक :06-May-2025
Total Views |
नागपूर,
Tatya Tope Nagar Nagpur तात्या टोपे नगर नागरिक मंडळ वाचनालय व विश्वमांगल्य सभा यांचे संयुक्त विद्यमाने तात्या टोपे नगर गणेश मंदिर येथे संस्कारवर्गाचे उद्घाटन केंद्रीय विश्वमांगल्य सभा कार्यालय मंत्री ॲड.निकिता शिरसाट यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून झाले. याप्रसंगी त्यांनी उपस्थित बालगोपालांना संत नामदेवांची बोधप्रद कथा सांगून संस्कार वर्गाचे महत्त्व विषद केले.५ ते १८ मे पर्यंत दररोज सकाळी ७-३० ते ९-०० वाजेपर्यंत ५ ते १४ वर्षे वयोगटातील मुला-मुलींकरिता हा वर्ग आयोजित करण्यात आल्याची माहिती आयोजकांनी दिली
 
 

chand 
 
 
बच्चे मंडळीला उन्हाळ्याच्या सुट्या लागल्यामुळे अभ्यासाव्यतिरिक्त इतर बाबतीत सर्वांगीण बौद्धिक विकास व चांगले संस्कार होण्याचे दृष्टीने हे आयोजन करण्यात आले आहे. वेळोवेळी समाजातील नामवंत निमंत्रितांचे मार्गदर्शन मिळणार असून पालकांनी आपल्या पाल्यांना या वर्गात अवश्य पाठवून संधीचा लाभ घ्यावा.Tatya Tope Nagar Nagpur असे आवाहन करून दरवर्षी प्रमाणे यंदाही वर्ग यशस्वी करण्यास नागरिक मंडळ संपूर्ण सहकार्य करेल असे मंडळाचे सहसचिव प्रकाश रथकंठीवार यांनी आश्वासन दिले.आजचे कार्यक्रमाला बालगोपालांनी मोठ्याप्रमाणात हजेरी लावली तसेच विश्वमांगल्य सभेच्या विद्या कांत शिबिराचे मार्गदर्शक वृषाली ढोक,.संगिता उमप,वृषाली ओक तसेच संयोजक-श्रीमती ज्योति गोरे,.मेघा गणोरकरमेघा पांडे,.सुषमा ठवरे.सरोज रथकंठीवारभाग्यश्री सेलोकर उपस्थित होते
सौजन्य: चंद्रहास मुळे, संपर्क मित्र