अकोल्याच्या तरूणाच्या लघुपटाची ‘कान्स’साठी निवड

07 May 2025 14:14:35
अकोला,
A doll made up of clay अकोल्याच्या तरूणाने निर्माण केलेल्या ‘अ डॉल मेड अप ऑफ क्ले’ या लघुपटाची जगप्रसिद्ध कान्स चित्रपट महोत्सवासाठी निवड झाली आहे. साहिल इंगळे असे या तरूणाचे नाव असून, ‘कान्स’साठी यंदा निवड झालेला हा देशातील एकमेव लघुपट आहे. केंद्र शासनाच्या माहिती व प्रसारण मंत्रालयांतर्गत कोलकात्याच्या सत्यजीत रे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटमध्ये साहिल इंगळे ‘प्रोड्युसिंग फॉर फिल्म अँड टेलिव्हिजन’ या कोर्सचे पदव्युत्तर शिक्षण घेत आहे. हा चित्रपट बंगाली भाषेबरोबरच युरोबा या नायजेरियाच्या भाषेत निर्माण करण्यात आला आहे. साहिल याची निर्मिती असून, इथोओपियाचा तरूण विद्यार्थी कोकोब गब्रवारिया टेस्फे याने दिग्दर्शन केले आहे.

the doll 
 
 
एक नायजेरियन तरूण खेळाडू भारतात फुटबॉलपटू म्हणून ओळख निर्माण करण्यासाठी वडिलांची शेती विकतो. त्याचे स्वप्न पूर्ण होण्यात येणारे अडथळे व प्रयत्न यांची ही कहानी आहे. चित्रीकरणासाठी केवळ इन्स्टिट्यूटची साधने वापरली. बाकी खर्च शून्य झाला. कुठल्याही आर्थिक मदतीशिवाय हा चित्रपट पूर्ण झाला. इच्छा असेल तर अल्प साधनांतही चांगला चित्रपट निर्माण करता येतो, अशी प्रतिक्रिया साहिल याने व्यक्त केली.
आपण आधी पुणे विद्यापीठातून जनसंज्ञापन विषयात पदवी घेतली आहे. जनसंज्ञापनात चित्रपटाची ताकद काय असते, याची जाणीव झाल्यावर आपण चित्रपट शिक्षणाकडे वळलो. देशातील चित्रपट शिक्षण देणाऱ्या संस्थांकडून आलेल्या २ हजार ७०० हून अधिक चित्रपटांतून केवळ १६ चित्रपटांची निवड झाली.A doll made up of clay लघुपट या श्रेणीत निवडला गेलेला आमचा देशातील एकमेव चित्रपट आहे, असे साहिल याने सांगितले. चित्रपट महोत्सवासाठी फ्रान्समध्ये जाण्यासाठी साहिल उद्या अकोला येथून रवाना होत आहे.
Powered By Sangraha 9.0