महाविद्यालयीन तरुणाची हत्या

07 May 2025 20:38:20
अमरावती, 
Amravati-murder : राजापेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ज्योती कॉलनीमध्ये राहणार्‍या एका २२ वर्षीय महाविद्यालयीन तरुणाची चाकुने भोसकुन हत्या करण्यात आली. ही घटना मंगळवारी रात्री १० वाजताच्या सुमारास घडली. ही घटना प्रेम प्रकरणातून झाल्याचे सांगण्यात येते. या प्रकरणी आठ आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.
 
 
 
murder
 
 
 
देवांशु अनिल फरताडे (२२, ज्योती कॉलनी, सिपना कॉलेज रोड, अमरावती) असे मृतक तरुणाचे नाव आहे. देवांशु हा मंगळवारी सांयकाळी घराच्या परिसरातच असलेल्या मोकळ्या मैदानात असताना त्याच्यावर तीन ते चार जणांनी चाकुने हल्ला चढवला. यावेळी त्याच्या पोटात चाकूचे घाव करण्यात आले. यातच तो रक्तबंबाळ झाला व त्याचा मृत्यू झाला. मारेकरी हे देवांशूच्या परिचित असावे, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. मारेकर्‍यांची नावे पोलिसांसमोर आली आली. त्यांचा शोध घेण्यासाठी राजापेठ पोलिसांचे पथके रात्रीच रवाना झाली.
 
 
जवळपासचे सीसीटीव्ही स्कॅन करण्यात आले, त्यानंतर हल्लेखोरांबाबत सुगावा लागला. पोलिसांनी रात्रीच सर्व हल्लेखोरांची ओळख पटवून त्यांना पकडण्याची योजना आखली. बुधवारी दुपारी १२ वाजण्यापूर्वी पोलिसांनी सर्व ८ आरोपींना पकडले. त्यात काही अल्पवयीनांचा समावेश आहे. ही कारवाई सहाय्यक पोलिस आयुक्त जयदत्त भवर, पोलिस निरीक्षक पुनीत कुलट, मिलिंद हिवरे, मनीष कर्पे, रवि लिखीतकर, पंकज खाटे, गणराज यांनी केली.
Powered By Sangraha 9.0