धानाच्या क्षेत्रात होणार शिंगाड्याची शेती

आत्मा अंतर्गत चंदनखेडा येथे शेतकर्‍यांचा अभ्यासदौरा

    दिनांक :07-May-2025
Total Views |
गिरड, 
Corn farming भागात चिबाड जमीन क्षेत्रावर शेतकरी धानाची शेती करतात. मात्र, शेतकर्‍यांना अपेक्षित उत्पादन मिळत नाही. धान शेतीला अधिक उत्पादन देणार्‍या शिंगाडा शेतीकडे शेतकर्‍यांनी वळावे यासाठी कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रनेच्या वतीने गिरड भागात शिंगाडा शेतीसाठी प्रोत्साहन दिल्या जातं आहे. यावर्षी १० एकरात शिंगाड्याची शेती शेतकरी करणार आहेत.
 
 
farmer
 
समुद्रपूर तालुयातील प्रगतशील शेतकर्‍यांनी कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) योजनेंतर्गत प्रकल्प संचालक (आत्मा) वर्धा डॉ. नलिनी भोयर यांच्या संकल्पनेतून व समुद्रपूर तालुका कृषी अधिकारी हर्षदा खेकारे यांच्या मार्गदर्शनाखाली भद्रावती तालुयातील चंदनखेडा येथील शिंगाडा उत्पादक शेतकरी किशोर ठावरी यांच्या शेताची पाहणी करून अभ्यास करण्यात आला.Corn farming शेतकरी अभ्यासदौर्‍याकरिता तालुयातील गिरड, शिवनफळ, उंदीरगाव व जोगिंनगुंफा येथील शेतकर्‍यांनी सहभाग घेतला. शिंगाडा उत्पादक शेतकरी किशोर ठावरी यांनी शिंगाडा पिकाची लागवड, चिबाड जमिनीत धान पिकाच्या बांधीत तलावात कमी खोलीच्या शेततळ्यात लागवड कशी करावी याबाबत मार्गदर्शन केले. बांध्याची खोली जमिनीची पूर्व मशागत खत पाणी व किड-रोग व्यवस्थापन बाबत संपूर्ण माहिती दिली. शिंगाडा पिकाची लागवड कशा पद्धतीने करावी याबाबत प्रात्यक्षिक करून दाखविले तसेच प्रशिक्षणार्थी शेतकर्‍यांनी बांधीत जाऊन लागवड करण्याचे बारकावे समजून घेतले.
यावेळी प्रगतशील शेतकरी चक्रधर भगत, गजानन गारघाटे यांनी शेतकर्‍यांना धान शेतीतील अडचणी आणि शिंगाडा शेतीची लागवड आणि शाश्वत उत्पादन घेण्याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी शेतकरी अरुण मसराम, प्रकाश जावदे, प्रशांत व्यापारी यांच्या आदी शेतकर्‍यांनी शिंगाडा शेतीविषयी प्रश्न उत्तराच्या तासात भाग घेत शिंगाडा शेती करण्याचा संकल्प केला.
यावेळी आर्वी, समुद्रपूर तालुयातील शेतकरी उपस्थित होते. नियोजन समुद्रपूर येथील आत्माचे सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक सुधीर हिवसे यांनी केले.