नवी दिल्ली,
Operation Sindoor 2025 पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर अवघ्या १५ दिवसांत भारताने पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर जोरदार हवाई हल्ला केला आहे. मंगळवारी रात्री भारतीय लष्कराने ‘ऑपरेशन सिन्दूर’ अंतर्गत ही कारवाई केली असून, पाकिस्तानमधील ९ दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले आहेत. या कारवाईत सुमारे ९० दहशतवादी मारले गेल्याची माहिती समोर आली आहे.

या पार्श्वभूमीवर Operation Sindoor 2025 बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी हिची बहीण आणि सोशल मीडियावर सक्रिय असलेली खुशबू पटानी हिने देखील प्रतिक्रिया दिली आहे. तिने एक व्हिडिओ पोस्ट करत नागरिकांना घाबरून न जाता सजग राहण्याचे आवाहन केले आहे.खुशबू आपल्या व्हिडिओमध्ये म्हणते, “तो दिवस अखेर आला, ज्याची आपण वाट पाहत होतो. भारताने पीओकेमधील दहशतवादी अड्ड्यांवर अचूक हल्ला केला आहे. सरकार आणि लष्कर आपले काम करत आहेत. आता आपली जबाबदारी आहे की आपण घाबरू नये आणि सज्ज राहावे.”ती पुढे म्हणाली, “काहीही झाले तरी संयम ठेवा. आपल्या सुरक्षेसाठी काय करावे लागेल, याची कल्पना ठेवा. जय हिंद, जय भारत, सपोर्ट ऑपरेशन सिन्दूर!”यापूर्वी देखील खुशबूने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत लोकांना मॉक ड्रिलचे महत्त्व समजावून सांगितले होते. सामाजिक कामांमध्ये सक्रीय असलेल्या खुशबूने अलीकडेच एका मुलीचा जीव वाचवून लोकांचे लक्ष वेधले होते.