संघटन वाढवण्यासाठी स्व. डॉ. आंबटकरांनी आयुष्य वेचले: भोपे

07 May 2025 20:20:54
पुलगाव,
Avinash Bhope : डॉ. रामदास आंबेडकर हे संघटन समर्पित नेतृत्व होते. विद्यार्थी परिषद, शिक्षण मंच, भारतीय जनता पार्टी व संघ परिवारातील अनेक संघटना या संघटनांची शक्ती वाढवण्यासाठी त्यांनी आयुष्य वेचले. त्यामुळे विदर्भामध्ये या संघटनांना यशोशिखर गाठता आले असे प्रतिपादन डॉ. रामदास आंबटकर यांचे सहकारी व मातृसेवा परिवाराचे संस्थापक अविनाश भोपे यांनी केले.
 
 
 
jklj
 
 
 
डॉ. रामदासजी आंबटकर मित्र परिवाराच्या वतीने ६ रोजी स्थानिक मातृसेवा सभागृहामध्ये आयोजित श्रद्धांजली सभेत बोलत होते. अध्यक्षस्थानी रंगलाल केजडीवाल कनिष्ठ महाविद्यालयाचे समन्वयक नुरसिंग जाधव होते.
 
 
भोपे पुढे म्हणाले की, डॉ. रामदास आंबटकर यांनी अविरत प्रवासाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांची मोठी चमू विदर्भामध्ये निर्माण केली. केवळ कार्यकर्ताच नव्हे तर परिवारातील सर्व सदस्यांशी त्यांचे आत्मीय संबंध होते. सर्वांच्या सुख दुःखामध्ये ते आत्मियतेने सहभागी व्हायचे. अनेक कार्यकर्त्यांची जडणघडण करून विदर्भामध्ये नेतृत्वाची फळी निर्माण केली असल्याचे भोपे म्हणाले.
 
 
यावेळी भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष संजय गाते यांनी आपल्यासारख्या असंख्य सामान्य कार्यकर्त्यांना त्यांचा परिस स्पर्श झाल्याने सामाजिक व राजकीय क्षेत्रामध्ये उत्तुंग भरारी घेता आली. कार्यकर्ता हेरून त्याची जडणघडण करत त्याचे नेतृत्व क्षमता विकसित करण्याचं कसब त्यांच्यामध्ये होते. ते व्यक्तिमत्व विकासाची चालती बोलती कार्यशाळा होती. त्यांनी निर्माण केलेल्या कार्यकर्त्यांची फळी आज विदर्भात नेतृत्व करीत आहे, अनेक जण राज्यस्तरावर नेतृत्व करत आहे. त्यांचे अकाली जाणे, विदर्भाच्या सामाजिक व राजकीय क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली असल्याचे गाते म्हणाले.
 
 
यावेळी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष रमेश सावरकर, शिवसेना नेते प्रशांत शहागडकर, विवेकानंद नागरी सहकारी पतसंस्था व प्राथमिक शिक्षक समितीचे अजय बोबडे, विठ्ठल वानखेडे, सचिन मुळे, नितीन रावेकर, संगीता देशमुख, सुबोध चचाने, किशोर गव्हाळकर, धर्मेंद्र अंबादे, अजय तिवारी व कार्यक्रमाचे अध्यक्ष नुरसिंग जाधव यांनी आपल्या संवेदना व्यक्त केल्या. संचालन मंगेश झाडे यांनी केले.
Powered By Sangraha 9.0