भगव्याचा सन्मान करूया !

    दिनांक :07-May-2025
Total Views |
नागपूर, 
Eternal culture श्रीराम नवमी आणि हनुमान जन्मोत्सवाचा उत्सव नागपुरात विविध ठिकाणी भव्य आणि दिव्य स्वरूपात साजरा झाला. हा सोहळा साजरा करताना अनेक ठिकाणी भगवा झेंडा दोरीवर, बांबूवर लावल्या गेला. श्रीरामाचे मोठे मोठे छायाचित्र, पोस्टर्स सुद्धा लटकवण्यात आले होते. शोभा यात्रेच्या तयारी दरम्यान तर अनेक ठिकाणी भगव्या रंगाची मोठमोठाली तोरणे लावण्यात आलेली आहे जी अर्धवट अवस्थेत लटकलेली दिसत आहेत. या तोरणांच्या दोऱ्यामुळे पशुपक्ष्यांच्या विहारालाही अडथळा येऊ शकतो.
 

bhgwa  
 
चैत्र पौर्णिमा आटपून आता महिना होत आला आहे. अवेळी येणाऱ्या पाऊस- वाऱ्यामुळे या छायाचित्रांची आणि भगव्या झेंड्याची धूळधाण होताना मनाला व्यथा होतात.Eternal culture जेवढ्या उत्साहाने हे झेंडे, छायाचित्र लावल्या गेलेत तेवढ्याच सन्मानाने हे उतरवल्या जावे ही कळकळीची प्रार्थना करावीशी वाटते जेणेकरून आपल्या सनातन संस्कृतीचा अनादर होणार नाही. कुठल्याही गोष्टीची सुरुवात जेवढी प्रसन्नतेने आणि पवित्रतेने होते तेवढीच सांगता सुद्धा आस्थेने होणं आवश्यक आहे.
सौजन्य :गौरी बेलन,संपर्क मित्र