ऑपरेशन सिंदूर नंतर अभिनेता फवाद खान म्हणाला ‘पाकिस्तान झिंदाबाद’

निष्पाप लोकांचे नाव घेतल्याचा आरोप

    दिनांक :07-May-2025
Total Views |
मुंबई,
Operation Sindoor काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ निष्पाप पर्यटक मारले गेले होते. या घटनेच्या १४ दिवसांनंतर, ७ मे रोजी भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’मोहीम राबवून पीओके आणि पाकिस्तानमधील ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले, ज्यात १०० हून अधिक दहशतवादी ठार केले.
 
 

Operation Sindoor  
भ्याड हल्ला
 
या कारवाईचे भारतात कौतुक होत असताना, पाकिस्तानी अभिनेता फवाद खान याने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत भारताच्या हल्ल्याला ‘भ्याड हल्ला’ म्हटले आहे. त्याने या हल्ल्यातील मृतांबद्दल संवेदना व्यक्त केल्या आणि समाजात प्रक्षोभक वक्तव्ये न करण्याचे आवाहन केले. “निर्दोष लोकांचा जीव गेला आहे, हे दुःख शब्दात व्यक्त करता येणारे नाही. चांगले विचार प्रभावी होवोत. पाकिस्तान जिंदाबाद!” असे त्याने आपल्या पोस्टमध्ये म्हटले.पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर अनेक निर्बंध लादले होते, ज्यात सिंधू पाणी करार रद्द करणे आणि पाकिस्तानी कलाकारांचे सोशल मीडिया अकाऊंट भारतात बंद करणे यांचा समावेश होता. फवाद खानचा ‘अबीर गुलाल’ हा हिंदी चित्रपटही आता प्रदर्शित होऊ शकणार नाही. फवाद खान व्यतिरिक्त अभिनेत्री माहिरा खान आणि हानिया आमिर यांनीही भारताच्या कारवाईला ‘भ्याड हल्ला’ संबोधले आहे, ज्यावर भारतीय नेटकऱ्यांनी तीव्र टीका केली आहे.