विश्‍व हिंदू परिषद मातृशक्तीच्या वतीने सिता नवमीचा कार्यक्रम

07 May 2025 19:23:16
कुरखेडा, 
Sita Navami : विश्‍व हिंदू परिषद दुर्गा वाहिनीच्या वतीने गुरूदेव सेवा मंडळ कुरखेडा येथे मंगळवारी सिता नवमीच्या निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
 
 
sita
 
 
 
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विश्‍वहिंदू परिषदेचे जिल्हा उपाध्यक्षा आशाताई बानबले होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून मिनाताई मिश्रा उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून विश्‍वहिंदू परिषदचे जिल्हा कार्याध्यक्ष वामनराव फाये यांनी माता सितेच्या जीवनावर सविस्तर माहिती देऊन सीता नवमीच्या कार्यक्रमाचे उद्दिष्ट उपस्थित माता भगिनींना समजावून सांगितले. यावेळी कार्यक्रमाला विश्‍वहिंदू परिषद तालुका सदस्या रेखा रासेकर तसेच बहुसंख्येने महिला वर्ग उपस्थित होते. प्रास्ताविक विश्‍वहिंदू परिषद तालुका मातृशक्तीच्या अध्यक्षा सामाजिक कार्यकर्त्या संगीता ठलाल यांनी केले. संचालन व आभार विश्‍वहिंदू परिषदचे जिल्हा सहमंत्री नानाजी खुणे यांनी केले.
Powered By Sangraha 9.0