तभा वृत्तसेवा मारेगाव,
Maregaon मारेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी मार्गदर्शन म्हणून तालुका कृषी विभाग एक खिडकीतर्फे तालुकास्तर खरीप हंगामपूर्व कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
या कार्यशाळेत शेतकऱ्याना बियाण्यांपासून तर बीजप्रक्रियेपर्यंत तसेच जमिनीच्या मशागतीपासून ते रासायनिक कीटकनाशक आणि खतवापराची सगळी माहिती देण्यात आली. परंतु यावेळी शेतकऱ्यांची असलेली नगण्य उपस्थिती कृषी विभागावर बोट ठेवून गेली.कृषी विभाग ‘एक खिडकी’तर्फे तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी फळबाग, बीज प्रक्रिया, कीड मार्गदर्शन, जमिनीची मशागत कशी करायची, इतर ठिकाणी सुरू असलेले पाणी फाऊंडेशनचे कार्य कसे चालते त्याची माहिती, सेंद्रीय शेतीविषयी माहिती, फवारणी किटचे वाटप, रासायनिक खत आणि औषधीचा वापर कमी करायचा, मोनोक्रोटोफॉस हे कीटकनाशक पिकांवर कमी मारायचे, ही माहिती देण्यात आली.
तसेच ‘चोर बीटी वापरू नका’ असेही यावेळी बजावण्यात आले. शेतकऱ्यांना शेतीसंबंधी इतर माहिती देण्यासाठी बुधवार, 7 मे रोजी मारेगाव कृषी विभाग कार्यालयात शेतकèयांसाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेला मारेगाव तालुका कृषी अधिकारी दीपाली खवले, मंडळ कृषी अधिकारी बुटले, डोंगरकर यांनी मार्गदर्शन केले. सर्व कृषी सहायक आणि कर्मचाऱ्यां ची कार्यशाळेला उपस्थिती होती. परंतु शेतकèयांची नगण्य उपस्थिती मात्र काही शंका उपस्थित करून गेली.
या कार्यशाळेतून शेतकèयांना जी माहिती मिळायला पाहिजे होती ती मिळाली नाही. ही बैठक केवळ पोकळ ठरली. सधन शेतकèयांना या बैठकीची माहिती नव्हती. ठराविक आणि नेहमीच्या संपर्कातीलच शेतकऱ्यांना बोलावल्या गेले. आम्ही काही कामानिमित्त मारेगाव येथे आलो असता कृषी विभागात चक्कर मारली असता आम्हाला या बैठकीची माहिती झाली. तसेच कृषी विभागाकडून मिळणारे साहित्यसुद्धा परिचयातीलच शेतकऱ्यांनाच दिले जाते.
हितेश ठक
शेतकरी हटवांजरी
लक्ष्यांक पार..!
खरीप हंगामासाठी आम्हाला जे लक्षांक देण्यात आले होते त्यानुसार आम्ही शेतकèयांसाठी बियाणे व इतर साहित्यांची मागणी केली. हे साहित्य शेतकèयांना सोडत पद्धतीने दिले जाईल. शेतकèयांनी गटशेतीवर भर द्यावा जेणेकरून शेतकèयांचा खर्च कमी आणि नफा जास्त होईल. याविषयी शेतकèयांना मार्गदर्शन करण्यात आले. पुढील बैठक लवकरच आमदार संजय दरेकर यांच्या मार्गदर्शनात घेण्यात येईल.
दीपाली खवले
तालुका कृषी अधिकारी मारेगाव