मसूद अजहर, भोग आपल्या कर्माची फळं !

07 May 2025 17:11:00
Masood Azhar पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय सैन्याने मंगळवारी रात्री पाकव्याप्त काश्मीरमध्ये (POK) नऊ ठिकाणी एअर स्ट्राईक केला. या मोहीमेला ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) असे नाव देण्यात आले होते. यामध्ये पीओकेमधील 9 दहशतवादी तळ क्षेपणास्त्रांचा मारा करुन उद्ध्वस्त करण्यात आले. यापैकी एका दहशतवादी तळावर कुख्यात दहशतवादी मसूद अजहर याचे कुटुंबीयही होते. यापैकी 14 जणांचा या हल्ल्यात मृत्यू झाला. यामध्ये मसूद अजहरची (masood azhar) आई आणि बहिणीचा समावेश होता. भारतात वारंवार दहशतवादी हल्ले करून अनेक निष्पाप लोकांचे जीव घेणाऱ्या मसूद अजहरवर आज स्वतःच्याच कुटुंबीयांचा जनाजा काढण्याची वेळ आली आहे.
 
 
अजहर
 
त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करुन आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ''अल्लाह तालाचे काही खास लोक असतात, जे शहीद होतात ते म्हणजे अल्लाहचे पाहुणे बनतात. माझ्या कुटुंबातील पाच जणांना ही खास संधी मिळाली. रात्रीच्या वेळी त्यांना ही शहादत मिळाली. पाच निष्पाप लहान मुलं, माझी आई जी खूप आजारी होती, माझे वडील, माझी बहीण आणि तिचा पती – सगळे या अपघातात शहीद झाले. माझ्या आईला कॅन्सर होता. ती अनेक दिवस आजारी होती. तिने मला सांगितलं होतं की, "माझ्या मृत्यूनंतर मला तुमच्या वडिलांजवळ दफन करा." आणि आश्चर्य म्हणजे ती आपल्या पतीजवळच दफन झाली, दोन महिने अगोदरच. हे खूप मोठं नशीब होतं. ''
अशी संवेदनशील पोस्ट लिहून मसूद अझहरने लोकांच्या मनात सहानुभूती निर्माण करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला आहे.Masood Azhar  जेव्हा त्याने केलेल्या हल्ल्यांमध्ये भारतात शेकडो नागरिक मृत्युमुखी पडले तेव्हा यापैकी कोणतेही नाते त्याला आठवले नाही , हे भारतीय कधीच विसरू शकत नाहीत . आपल्या कर्माची फळं इथेच भोगावी लागतात, हे सनातन सत्य पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे.
Powered By Sangraha 9.0