VIDEO: 'ही मालिका इथेच थांबू नये, हा माझ्या सिंदूरचा हिशेब आहे'

07 May 2025 21:34:51
नवी दिल्ली,
Operation Sindoor : पहलगाम दहशतवादी हल्ल्यात प्राण गमावलेल्या विनय नरवाल यांची पत्नी हिमांशी नरवाल यांनी पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर केलेल्या हल्ल्याबाबत मोठे विधान केले आहे. हिमांशी म्हणाल्या की हा क्रम इथेच थांबू नये... सर्व दहशतवाद्यांचा एक-एक करून खात्मा केला पाहिजे. हिमांशी पुढे म्हणाल्या की, मी ऑपरेशन सिंदूरचे हे नाव स्वतःशी जोडते. २६ लोकांच्या निर्घृण हत्येला मोदीजींनी चोख प्रत्युत्तर दिले आहे.
 

Operation Sindoor
 
 
हिमांशी पंतप्रधान मोदींना म्हणाल्या- धन्यवाद
 
 
सर्व दहशतवादी आणि त्यांच्यासह दहशतवाद पूर्णपणे संपवला पाहिजे. ही कृती इथेच थांबू नये. सर्व दहशतवाद्यांचा खात्मा झाला पाहिजे, मी माझा नवरा गमावला आहे. मी स्वतःला ऑपरेशन सिंदूरशी जोडते. २६ लोकांच्या क्रूर हत्येला मोदींनी प्रतिसाद दिला आहे आणि मी याबद्दल पंतप्रधान मोदींचे आभार मानते.
 
 
 
Powered By Sangraha 9.0