शहिद संतोष जगदाळेंसाठी देशाचा न्याय

"ऑपरेशन सिंदूर" भारताने उडवले दहशतवादी अड्डे

    दिनांक :07-May-2025
Total Views |
पुणे,
Santosh Jagdale भारतीय सैन्य दलांनी पुन्हा एकदा देशविरोधी शक्तींना खड्यासारखे उत्तर दिले असून, बुधवारी (७ मे) रात्री उशिरा भारतीय हवाई दलाने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी ठिकाणांवर प्रखर हवाई हल्ले केले. हे हवाई हल्ले अत्यंत अचूकतेने करण्यात आले असून, जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तैय्यबा या दहशतवादी संघटनांच्या वरिष्ठ नेतृत्वाला लक्ष्य करण्यात आले आहे. २०१९ मधील बालाकोट हल्ल्यानंतर आणि २०१६ च्या उरी सर्जिकल स्ट्राईकनंतरचा हा सर्वात मोठा हवाई हल्ला मानला जात आहे.
 
 
Santosh Jagdale
 
या हल्ल्याची Santosh Jagdale  पार्श्वभूमी म्हणजे काही दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेला दहशतवादी हल्ला, ज्यात महाराष्ट्रातील पुणे येथील संतोष जगदाळे हे शहीद झाले होते. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण देशात तीव्र संतापाची लाट उसळली होती. या हल्ल्याला प्रत्युत्तर देताना भारतीय लष्कराने 'ऑपरेशन सिंदूर' राबवत पाकिस्तानातील दहशतवादी अड्ड्यांवर थेट हल्ला केला.या हवाई कारवाईनंतर संतोष जगदाळे यांच्या पत्नी प्रगती जगदाळे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “दहशतवाद्यांनी आमच्यासारख्या अनेक महिलांचे कुंकू पुसले. त्याला भारत सरकारने दिलेले हे उत्तर अत्यंत योग्य आणि न्याय्य आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ या नावानेच माझ्या डोळ्यात अश्रू आले. मी या कारवाईसाठी भारत सरकारचे मनापासून आभार मानते.”
 
 
ऑपरेशन सिंदूरची रणनीती आणि परिणाम
 
 
भारतीय Santosh Jagdale  हवाई दल आणि लष्कर यांच्या संयुक्त कारवाईत हे हल्ले करण्यात आले. भारतीय वायुसेनेच्या लढाऊ विमानांनी निशाणा साधून बॉम्ब टाकले, तर लष्कराकडून जमिनीवरून क्षेपणास्त्रांचा मारा करण्यात आला. इतकी प्रभावी आणि वेगवान ही कारवाई होती की पाकिस्तानच्या हवाई दलाला ही आक्रमणे लक्षात येण्याआधीच दहशतवादी अड्डे उध्वस्त झाले होते. भारतीय गुप्तचर संस्थांच्या मदतीने अगदी अचूक माहितीच्या आधारे ही ठिकाणे निशाणा बनवण्यात आली होती.भारतीय लष्कराच्या या कारवाईनंतर पाकिस्तानने तातडीने कराची आणि लाहोरचे हवाई क्षेत्र बंद केले. त्याचप्रमाणे लाहोर आणि सियालकोट विमानतळ पुढील ४८ तासांसाठी बंद ठेवण्यात आले आहेत. यावरून पाकिस्तानची घबराट स्पष्ट होते.