खा. प्रतीभा धानोरकर यांच्या प्रयत्नांना यश

07 May 2025 16:20:32
तभा वृत्तसेवा आर्णी,
Pratibha Dhanorkar अरुणावती प्रकल्पाचे पाणी नदीपात्रात सोडण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे. कडाक्याच्या उन्हात सर्वत्र तीव्र पाणीटंचाई जाणवत असून घरगुती उपयोगासाठी, जनावरासाठी व शेतीकरिता लागणाऱ्या पाण्याअभावी आर्णी व घाटंजी तालुक्यात पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली असून नागरिक हवालदिल झाले आहे.
 

Pratibha Dhanorkar  
अरुणावती नदीकाठावरील नागरिकांनी धरणातून पाणी सोडण्याकरिता प्रयत्न करावे अशी विनंती विभागाच्या खासदार प्रतीभा धानोरकर यांना केली होती. या मागणीची खासदार प्रतीभा धानोरकर यांनी तत्काळ दखल घेत जिल्हाधिकाèयांशी 22 एप्रिल ला बैठकीत लवकर पाणी सोडण्याची मागणी केली. जिल्हाधिकाऱ्यांनी पाणी सोडण्याबाबत कार्यवाही सुरू केली. पालकमंत्री संजय राठोड यांनी जिल्हा पाणी टंचाई आढावा बैठकीत पाणी सोडण्याबाबत सूचना केल्या.
1 मे ला जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात तालुक्यातील सायखेडा, लिंगी, चिकणी, भंडारी, महाळूगी, काठोडा, आमनी, आसरा, विठोली, अंतरगाव, केळझरा, येरमल, हेटी, शिवर, पळशी या गावांची पिण्याच्या पाण्याची पातळी कमी झाल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ यांच्या विनंतीवरून अरुणावती धरणातून आरक्षित 2 दलघमि पाण्यापैकी 1 दलघमि पाणी सोडण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. पाण्याची आतुरतेने वाट पाहत असलेल्या गावकèयांनी आनंद व्यक्त केला.
Powered By Sangraha 9.0