भविष्यातील उद्योजकांना घडवण्याचे ध्येय

07 May 2025 17:44:38
नागपूर,
Ramdev Baba University रामदेवबाबा विद्यापीठ विविध शैक्षणिक शाखांमध्ये उल्लेखनीय प्रतिभा वाढवण्यासाठी व नवोन्मेषकांना प्रोत्साहन देण्यासाठी कायम समर्थन, प्रोत्साहन देते. असंख्य विद्यार्थ्यांना त्यांची स्वप्ने साध्य करण्यासाठी व यशस्वी उद्योजक बनण्यासाठी मार्गदर्शन व मदत करत असल्याची माहिती कुलपती डॉ. एस.एस. मंथा व कुलगुरू डॉ. राजेश पांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
 

Ramdev Baba University 
त्यांनी सांगितले की, रामदेवबाबा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट टेक्नॉलॉजी बिझनेस इन्क्युबेटर्स टीबीआय फाऊंडेशन ही कंपनी विद्यार्थ्यांच्या कल्पनांना वास्तविक जगातील स्टार्टअपमध्ये रूपांतरित करण्यासाठी तयार करण्यात आली होती. 2016 पासून सुरू करण्यात आलेल्या या फाऊंडेशनने व्यावहारिक मार्गदर्शन, संरचित इनक्युबेशन व एंजेल गुंतवणूकदार, व्हीसी व सरकारी अनुदानाद्वारे निधीची उपलब्धता बासह पंचाहत्तरहून अधिक कल्पना रुजवल्या आहेत.
 
 
‘कल्पनांपासून परिणामांपर्यंत’ म्हणजेच सुरुवातीच्या टप्प्यातील उद्योजकांना सक्षम करणे व कल्पना व्यवहार्य व्यवसाय उपक्रमांमध्ये रूपांतरित करणे, हे विद्यापीठाचे ध्येय आहे. यशस्वीरित्या 15 विद्यार्थ उपक्रमांना विद्यापीठाकडून थट त्यांचा पहिला गुंतवणूक निधी मिळाला, असे कुलगुरू डॉ. राजेश पांडे यांनी स्पष्ट केले.
 
 
विद्यार्थी व नंतर आताचे निवडक यशस्वी उद्योजकांनी यावेळी प्रत्यक्ष प्रवास कथन केला. केवळ 24 वर्षांचे यश पांडे व सोनल बहिलानी या दोघांनी चॉकलेटवरील प्रेमापोटी रोक्का या ब्रँडने चॉकलेट निर्मिती सुरू केली. 100 एक्स व्हीसीकडून 1.25 कोटी रुपये निधी प्राप्त झाला. लोकप्रिय रिअ‍ॅलिटी शो शार्क टॅक इंडियामध्ये त्यांचा हा उपक्रम गाजण्यापर्यंतचा प्रवास त्यांच्या कार्यक्षमतेमुळे आणि विद्यापीठाच्या पाठिंब्यामुळे शक्य झाला.बायोस्पेक्ट्रॉनिक्सच्या डॉ. संगीता सम्मानवार यांनी सांगितले की, त्यांच्या पीएच.डी. संशोधनाचे रूपांतर बायो स्पेक्ट्रॉनिक्समध्ये केले. या पेटंटद्वारे रक्त विश्लेषक, निदान व सुलभ सुविधा देण्यासाठी डिझाइन केलेले आहे. गौरव चव्हाण, आशुतोष दोहारे, अपूर्व डे, सिद्धार्थ मिश्रा आदींनी त्यांच्या नवोक्रमांची माहिती दिली.भारत सरकारच्या एमएसएमई मंत्रालयाने टीबीआय फाऊंडेशनला होस्ट इन्स्टिट्यूशन/बिझनेस इन्क्यूबेटर म्हणून ओळखले आहे, ज्यामुळे ते प्रादेशिक उद्योजक विकास केंद्र म्हणून उदयास येत आहे. ग्रामीण व कृषी-आधारित स्टार्टअप्सच्या प्रचारासाठी अ‍ॅसपायर योजनेंतर्गत निधीदेखील मंजूर करण्यात आला आहे, जो विद्यापीठाचा समावेशक व शाश्वत नवोपक्रमावर भर दर्शवितो. प्राचार्य डॉ. मनोज चांडक, फाऊंडेशनचे संचालक डॉ. रूपेश पायस उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0