घाटंजीत तुकडोजी महाराज जयंती उत्साहात

    दिनांक :07-May-2025
Total Views |
तभा वृत्तसेवा घाटंजी,
Tukdoji Maharaj Jayanti राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अस्थिकलशस्थळी बुधवार, 30 एप्रिलला 116 वा जयंती उत्सव साजरा करण्यात आला. सकाळपासूनच राष्ट्रनिर्माण विचारधारांच्या शिलेदाराकडून अस्थिकलशस्थळी विवीध ग्राम उपयोगी कार्यक्रम घेण्यात आले. यामधे ग्रामसफाई, वृक्ष लागवड, ग्रामसुधारणेवर आधारित भजने सादर करण्यात आली.
 
 
 
Tukdoji Maharaj Jayanti
संध्याकाळी गुरुदेव सेवामंडळ व कार्यक्रमाप्रसंगी आमंत्रित मान्यवरांच्या उपस्थितीत सामुदायिक प्रार्थना अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने घेण्यात आली. प्रार्थना आटोपल्यावर नियोजितस्थळी सद्य परिस्थिती व इतिहासावर मार्गदर्शन करताना नारायण भोयर यांनी 15 ऑक्टोबर 1968 ला हा अस्थिकलक्ष मोझरीवरुन घाटंजी येथे आणल्या गेला हे सांगत या जागेवर मोझरीसारखं महत्व असल्याचे सांगितले. यापूर्वी नारायण गोडे येथे येऊन कार्यक्रम करायचे पण त्यांना साथ मिळत नव्हती, पण निष्ठावान भक्त खडसे यांची संकल्पना होती की या ठिकाणाला महत्व यावं यासाठी राष्ट्रनिर्माण विचारधारा संचाने अथक प्रयत्न करुन या पडीत जागेत जिवंतपणा आणला, असेही ते म्हणाले. भजनसंध्या कार्यक्रमात गायक संतोष मानकर, तबलावादक एकोणकार व अन्य साथसंगत घेण्यात आली.
याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते सुनील देठे, मोरेश्वर वातिले, मधुकर निस्ताणे, संजय ढोणे, टोंगे महाराज, अनंत नखाते उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रनिर्माण विचारधारा संचातर्फे करण्यात आले. कार्यक्रमासाठी राजेंद्र ढवळे, पांडुरंग किरणापुरे, संतोष गोल्हर, संतोष वानखेड़े, भगवान चौधरी यांनी परिशम घेतले.