यशवंत पंचायतराज अभियान पुरस्कारात वर्धा जिप राज्यात प्रथम

07 May 2025 20:18:03
वर्धा, 
Wardha Zilla Parishad : प्रशासकीय व्यवस्थापन व विकास कार्यातील उत्कृष्ट योगदानासाठी वर्धा जिल्हा परिषदेने राज्य शासनाच्या वर्ष २०२३-२४ च्या यशवंत पंचायतराज अभियान पुरस्कारांतर्गत राज्यातून प्रथम क्रमांक पटकावला. ३० लाख रुपये पुरस्काराचे स्वरूप आहे. ग्राम विकास विभागाने ६ मे रोजी शासन निर्णय निर्गमीत करून यशवंत पंचायत राज अभियान सन २०२३-२४ साठी राज्यातील अत्युत्कृष्ट जिल्हा परिषद व पंचायत समित्यांना विभाग व राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर केले आहेत.
 
 

wardha 
 
 
 
पुरस्कारांमध्ये जिल्हा परिषदांच्या श्रेणीत वर्धा जिल्हा परिषदेला प्रथम क्रमांकाचे ३० लाख रुपयांचे पारितोषिक जाहीर झाले आहे. नागपूर विभागातून कारंजा (घा.) व कळमेश्वर पंचायत समितीला पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार विभागून जाहीर झाला आहे. ११ लाख रुपये असे पुरस्काराचे स्वरुप आहे. सेलू पंचायत तिसर्‍या क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला असून पुरस्काराची राशी ६ लाख आहे.
 
 
 
वर्धा जिल्हा परिषदेच्या या यशाचे श्रेय माजी मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे आणि वर्तमान मुख्य कार्यकारी अधिकारी जिथिन रहमान यांच्या कुशल मार्गदर्शनाला जाते. त्याचबरोबर, जिल्हा परिषदेतील सर्व विभागप्रमुख आणि कर्मचारी यांच्या अथक परिश्रम आणि समर्पित कार्यामुळे हे यश संपादन करणे शय झाले. प्रत्येक विभागाने आपापल्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करत विकासाच्या विविध योजना प्रभावीपणे राबवल्या आणि पंचायत राज व्यवस्थापनात महत्त्वपूर्ण योगदान दिले.
Powered By Sangraha 9.0