तभा वृत्तसेवा यवतमाळ,
World Audiovisual Entertainment Summit सांस्कृतिक कार्य विभाग महाराष्ट्राच्या संस्कृतीचे जतन व संवर्धनाचे कार्य करीत आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. यंदा 1 ते 4 मे दरम्यान ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिट’चे आयोजन जिओ कन्व्हेन्शन सेंटर, वांद्रे, मुंबई या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते. याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यात वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समीटच्या अनुषंगाने ध्वनी चित्र रंजन या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्त येथील कौशल भवनात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशांत बनगिनवार, समाजसेवक प्रमुख अतिथी, विनायक निवल, समाजसेवक प्राची बनगिनवार, सूत्रसंचालन सतीश पवार यांनी केले. यवतमाळातील कलावंतांनी संयुक्त महाराष्ट्राचा पोवाडा, मनोरंजन आणि जाहिरात क्षेत्रातील स्थान, लखलख चंदेरी या गाण्यावर नृत्य सादरीकरण, महाराष्ट्र गीतांची मेडली, स्थानिक लोककला नृत्य सादरीकरण, स्थानिक वाद्य जुगलबंदी, नाट्यगीत, चित्रपट गीत लोकगीत लोकधारा असे विविध कार्यक्रमाची सादरीकरण करण्यात आले.
कार्यक्रमाची World Audiovisual Entertainment Summit संकल्पना अॅड. आशिष शेलार, सांस्कृतिक कार्य तसेच माहिती व तंत्रज्ञान मंत्री यांची असून या कार्यक्रमास मुख्यमंत्र्याचे अपर मुख्य सचिव तथा सांस्कृतिक कार्यविभाग अपर मुख्य सचिव विकास खारगे यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे यांनी केले.