शेतकर्‍यांच्या बांधावर पोहचले खा. डॉ. किरसान

(अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची केली पाहणी)

    दिनांक :07-May-2025
Total Views |
गडचिरोली, 
Namdev Kirsan : मागील काही दिवसापासून जिल्ह्यात सुरू असलेल्या वादळी वारा, अवकाळी पाऊस व गारपीटमुळे शेतकर्‍यांच्या उन्हाळी धान व मका पिकाला जोरदार फटका बसलेला आहे. त्यामुळे खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी थेट चामोर्शी तालुक्यातील अनेक शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली.
 
 
 
gad
 
 
 
वैनगंगा नदी काठावरील कुनघाडा, फराडा परिसरात अनेक शेतकरी सिंचनाची सोय असल्याने उन्हाळी धान व मका पिकाची लागवड करतात. मात्र सतत तीन-चार दिवस झालेल्या वादळी वारा व गारपीटमुळे शेतकर्‍यांच्या तोंडातील घास गेले आहे. ऐन कापणी व मळणीला आलेल्या धानपिकाची मोठ्या प्रमाणात नुकसान झाली आहे. अनेक शेतकर्‍यांनी बँकेकडून कर्ज घेवून उन्हाळी धानाची लागवड केलेली होती. बँकेचे कर्जे कसे फेडायचे या चिंतेत शेतकरी आहे. यावेळी नुकसानग्रस्त भरपाई मिळण्यासाठी आपण शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही खासदार डॉ. किरसान यांनी दिली.
 
 
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मनोहर पाटील पोरेटी, काँगेसचे तालुकाध्यक्ष प्रमोद भगत, अनुसूचित जाती सेल अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, जिल्हा उपाध्यक्ष अनिल कोठारे, पर्यावरण सेल अध्यक्ष राजेश ठाकूर, अविनाश चलाख, सरपंच सुदर्शन हजारे, उपसरपंच नुमचंद भिवणकर, तेजस कोंडेकर, आशिष मशाखेत्री, आशिष घेर, कुणाल आभारे, राणी देशमुख, पांडुरंग टिकले, अशोक वासेकर, दीपक भांडेकर, दशरथ नैताम, अतुल भांडेकर, गणेश दूधबळे, घनश्याम भांडेकर यासह नुकसानग्रस्त शेतकरी, संबिधित विभागातील अधिकारी उपस्थित होते.