मिटनापूरला कव्वालीचा बहारदार कार्यक्रम

08 May 2025 20:10:26
तभा वृत्तसेवा बाभुळगाव,
Qawwali येथून जवळ असलेल्या मिटनापूर येथील हजरत फकीरशहा वली उर्फ डोलशहा वलीबाबा यांच्या प्रेरणेने समस्त गावकèयांच्या वतीने शुक्रवार, 9 मेच्या संध्याकाळी कव्वालीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. नागरिकांनी कार्यक्रमाचा आनंद घ्यावा, असे आवाहन एकता उर्स कमिटीतर्फे करण्यात आले आहे.सामाजिक सलोखा कायम ठेवला जावा याकरिता सर्व धर्मीयांच्या वतीने हा कव्वालीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यात उत्तर प्रदेशचे प्रसिद्ध कव्वाल जुनेद सुलतानी व मुंबईच्या कव्वाला नुसरत खानम यांची जुगलबंदी होईल.
 
 

Qawwali
दोन्ही कव्वाल Qawwali  चांगले प्रसिद्ध गायक असून याचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. उद्घाटन कार्यक्रमाला पालकमंत्री संजय राठोड, आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके, आमदार बाळासाहेब मांगुळकर, जिल्हा सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष अमन गावंडे प्रामुख्याने उपस्थित राहतील.
Powered By Sangraha 9.0