नागपूर,
Artificial Nails साजेशा पेहराव, आकर्षक मेकअप आणि ट्रेंडी अॅक्सेसरीजसोबत आता 'नेल आर्ट' देखील फॅशनचा अविभाज्य भाग बनला आहे. खासकरून आर्टिफिशियल नखे (नखांचे सेट्स) लावण्याकडे तरुणींमध्ये झपाट्याने ओढ वाढत आहे. पार्टी, फॅशन शो, लग्नसराई किंवा अगदी कॉलेज फंक्शनसाठीसुद्धा आर्टिफिशियल नखांची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे.
बाजारात सध्या विविध रंग, डिझाईन आणि लांबीमध्ये आर्टिफिशियल नखे उपलब्ध आहेत. काही नखे प्रेस-ऑन प्रकारात मिळतात, तर काही विशेष जेल किंवा अॅक्रेलिक पद्धतीने लावले जातात. या नखांवर आकर्षक नेल आर्ट करून संपूर्ण लूक अधिक खुलतोबी. सध्याच्या सोशल मीडियावरही नेल आर्टचे व्हिडीओ, रील्स यामुळे या फॅशनचा प्रचार वेगाने होत आहे. मात्र दीर्घकाळ वापरल्यास नखांना इजा होण्याची शक्यता असते, म्हणून सौंदर्यतज्ज्ञ योग्य काळजी घेण्याचा सल्ला देतात.
आर्टिफिशियल नखांचे (नखांचे सेट्स) अनेक प्रकार असतात, जे लावण्याच्या पद्धतीनुसार आणि त्यांच्या टिकाऊपणानुसार वेगवेगळे विभागले जातात. खाली प्रमुख प्रकार दिले आहेत
१. प्रेस-ऑन नेल्स (Press-on Nails):
सहज वापरण्याजोगे, घरच्या घरी लावता येतात.
यामध्ये नखाच्या आतील बाजूस आधीच गोंद असतो किंवा वेगळा गोंद वापरावा लागतो.
काही दिवस टिकतात; पार्टी किंवा एका इव्हेंटसाठी योग्य.
२. जेल नेल्स (Gel Nails):
जेल बेस वापरून लावले जातात आणि UV लाइटखाली वाळवले जातात.
नैसर्गिक नखांवर सरळ जेल लेयर लावून लांबी वाढवली जाते.
साधारणतः २-३ आठवडे टिकतात.
नखांना चमकदार आणि मजबूत लुक मिळतो.
३. अॅक्रेलिक नेल्स (Acrylic Nails):
लिक्विड मोनॉमर आणि पावडरचा वापर करून नखे तयार केली जातात.
या नखांचे स्वरूप घट्ट आणि टिकाऊ असते.
दीर्घकाळ टिकतात, पण देखभाल आवश्यक.
४. डिप पावडर नेल्स (Dip Powder Nails):
नखांना आधी बेस कोट लावून त्यावर रंगीत पावडर लावली जाते.
हे नखे जेलपेक्षा अधिक टिकाऊ आणि नैसर्गिक दिसतात.
३ ते ४ आठवडे टिकू शकतात.
५. स्कल्पचर्ड नेल्स (Sculptured Nails):
नैसर्गिक नखांवर मोल्ड वापरून हवी तितकी लांबी तयार केली जाते.
जेल किंवा अॅक्रेलिक वापरून ही प्रक्रिया केली जाते.
हे नखे व्यक्तिनुसार खास डिझाईन केले जातात.
६. फाइबर ग्लास किंवा सिल्क रॅप्स:
नखांवर सिल्क किंवा फाइबर ग्लासचे पट्टे लावले जातात.
नैसर्गिक नखे मजबूत करण्यासाठी वापरले जातात.
सौम्य आणि नैसर्गिक लुक देतात.