ऑपरेशन सिंदूरवर बॉलिवूडचा ठाम पाठिंबा

08 May 2025 12:00:36
मुंबई,
Operation Sindoor पुलवामा आणि पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्याने पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर हवाई हल्ला करून ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवले. या कारवाईत भारताने देशातील निष्पाप नागरिकांचा आणि शहीद जवानांचा बदला घेतल्याचे म्हटले जात आहे. या ऐतिहासिक आणि ठोस पावल्यावर संपूर्ण देशात अभिमान आणि उत्साहाचे वातावरण असून, बॉलिवूड कलाकारांनीही भारतीय सैन्याच्या या धाडसी कारवाईचं जोरदार समर्थन केलं आहे.
 
 
Operation Sindoor
 
अजय देवगणचा अभिमानाचा सूर
बॉलिवूड अभिनेता अजय देवगणने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर करत लिहिले, "आपल्या माननीय पंतप्रधान @narendramodi आणि आपल्या भारतीय सैन्याला सलाम, भारत अभिमानाने उभा आहे आणि मजबूत आहे. जय हिंद!" अशा शब्दांत त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या.
 
 
शहीद कन्येचा सुस्पष्ट संदेश – निमरत कौर
अभिनेत्री निमरत कौर यांनीही ऑपरेशन सिंदूरला ठाम पाठिंबा दिला आहे. त्या म्हणाल्या, "मी एका शहीदाची मुलगी आहे. त्यामुळे शहीद कुटुंबांचे दुःख मला अगदी जवळून माहिती आहे. भारतीय सैन्याच्या या पावलाने प्रत्येक शहीदाच्या कुटुंबाला न्याय मिळाला आहे."
 
 
विवेक ओबेरॉयने व्यक्त केली तीव्र भावना
 
अभिनेता विवेक ओबेरॉयनेही आपली प्रतिक्रिया देताना लिहिले, "ऑपरेशन सिंदूर म्हणजे भारतातील विधवांच्या अश्रूंचा बदला आहे." त्याने भारतीय सैन्याच्या या कारवाईचं स्वागत केलं.
 
 
 
सुनील शेट्टी आणि विकी कौशल यांचं समर्थन
 
 
सुनील शेट्टी यांनी सोशल मीडियावर लिहिले, "दहशतवादाला भारतात स्थान नाही. जो भारताला दुखावेल, त्याला उत्तर मिळेलच." विकी कौशलनेही भारतीय सैन्याचे कौतुक करत लिहिले, "सामर्थ्य, संयम आणि न्याय – हेच खरे भारतीय लष्कराचे प्रतिक आहे. ऑपरेशन सिंदूर याचे उत्तम उदाहरण आहे."
 
 
आलिया भट्ट आणि शाहिद कपूर यांची प्रतिक्रियाही लक्षवेधी
आलिया भट्टने लिहिले, "मी आज आणि दररोज आपल्या सशस्त्र दलांना सलाम करते. जय हिंद." तर अभिनेता शाहिद कपूरने एका लढाऊ विमानाचा फोटो शेअर करत लिहिले होते, "भारत कधीही कोणालाही चिथावणी देत नाही, पण भारत कधीही विसरत नाही." तथापि, काही वेळाने त्याने आपल्या पोस्टमधून हे कॅप्शन हटवले.भारतीय सैन्याच्या 'ऑपरेशन सिंदूर'वर बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी ठामपणे भारतीय सैनिकांच्या पाठीशी उभं राहत त्यांचं मनापासून कौतुक केलं आहे. सोशल मीडियावरून हे कलाकार देशभक्तीची जाणीव जागृत करत असून, देशहितासाठी घेतलेल्या कठोर निर्णयाचं त्यांनी स्वागत केलं आहे.
Powered By Sangraha 9.0