नवी दिल्ली,
CISF देशासाठी खेळण्याची आणि सुरक्षा दलात सहभागी होण्याची संधी शोधणाऱ्या महिला हॉकी खेळाडूंसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) ने महिला उमेदवारांसाठी हेड कॉन्स्टेबल (खेळ विभाग) या पदासाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. ही भरती फक्त क्रीडा कोट्याअंतर्गत असून, हॉकीमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या महिला खेळाडूंना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे.
पात्रता अटी :
शैक्षणिक पात्रता :
उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डामधून १२वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
हॉकी खेळात राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, राज्य, विद्यापीठ किंवा शालेय स्तरावर प्रतिनिधित्व केलेले असावे.
जर उमेदवाराने राष्ट्रीय किंवा आंतर-विद्यापीठ स्पर्धेत पदक जिंकले असेल, तर ती अतिरिक्त पात्रता मानली जाईल.
वयोमर्यादा :
उमेदवाराचे वय १ ऑगस्ट २०२५ रोजी किमान १८ वर्षे आणि कमाल २३ वर्षे असावे.
अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग आणि इतर आरक्षण मिळणाऱ्या प्रवर्गातील उमेदवारांना सरकारी नियमानुसार वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.
भरती प्रक्रिया :
या पदासाठी निवड प्रक्रियेमध्ये खालील टप्पे असतील –
1. खेळ चाचणी – उमेदवाराच्या हॉकी कौशल्यांची प्रत्यक्ष चाचणी
2. शारीरिक मापदंड तपासणी (PST)
3. वैद्यकीय तपासणी
या सर्व टप्प्यांत यशस्वी झालेल्या उमेदवारांची अंतिम निवड केली जाईल.
वेतनश्रेणी :
निवड झालेल्या उमेदवारांना केंद्र सरकारच्या नियमानुसार ₹२५,५०० ते ₹८१,१०० पर्यंत वेतन मिळेल.
यासोबतच केंद्र सरकारच्या इतर सुविधा देखील लागू होतील.
अर्ज कसा कराल?
उमेदवाराने अधिकृत वेबसाइट cisfrectt.cisf.gov.in वर जाऊन नवीन नोंदणी करावी.
लॉगिन केल्यानंतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत.
अर्ज शुल्क भरून फॉर्म ऑनलाइन सबमिट करावा.
भविष्यातील उपयोगासाठी अर्जाची प्रिंटआउट जतन करून ठेवावी.
शेवटची तारीख :
अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच जाहीर होणार आहे, त्यामुळे इच्छुक महिला खेळाडूंनी लवकरात लवकर अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी.