नवी दिल्ली,
Virat Kohli ३० एप्रिल रोजी अभिनेत्री अवनीत कौर हिने तिचे काही स्टायलिश फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले. या फोटोंमध्ये ती हिरव्या रंगाच्या क्रॉप टॉप आणि मिनी स्कर्टमध्ये झळकली होती. या पोस्टवर क्रिकेटपटू विराट कोहली याने ‘लाईक’ केल्याचे दिसून आले आणि लगेचच सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले.
विशेष म्हणजे, याच दिवशी विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा हिचा वाढदिवस होता, त्यामुळे नेटकऱ्यांनी विराटच्या ‘लाईक’वर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. हे प्रकरण सोशल मीडियावर इतकं गाजू लागलं की खुद्द विराट कोहलीने यावर स्पष्टीकरण देत म्हटले की, “ही ‘लाईक’ चुकून झाली असून हे अल्गोरिथममधील गडबडीमुळे घडले आहे. मी जाणूनबुजून ही पोस्ट लाईक केलेली नाही.”
राहुल वैद्यची टोकदार प्रतिक्रिया
विराट Virat Kohli कोहलीच्या या स्पष्टीकरणावर गायक राहुल वैद्य याने टोमणे मारणारे व्हिडिओ शेअर करत जोरदार हल्ला चढवला. त्याने विराट कोहलीचा अल्गोरिथम सिद्धांत उडवून लावत, उपरोधिक भाषेत म्हटले की, “जर माझ्याकडून एखाद्या मुलीचा फोटो लाईक झाला, तर कृपया मी काही केले नाही, ती अल्गोरिथमची चूक आहे. जनसंपर्क करू नका!”
या व्हिडिओमध्ये राहुल वैद्यने हेही सांगितले की विराट कोहलीने त्याला इंस्टाग्रामवर ब्लॉक केलं आहे. मात्र, पुढे मिश्कीलपणे म्हणाला की, “कदाचित हे त्यांनी केलं नसेल, हीही अल्गोरिथमची चूक असावी!”
विराटला सहकारी खेळाडूंचा पाठिंबा
राहुल Virat Kohli वैद्यच्या या विधानांनी आणि टोमण्यांनी सोशल मीडियावर आणखी वादंग निर्माण झाला. याच दरम्यान, विराट कोहलीचे सहकारी क्रिकेटपटू युझवेंद्र चहल आणि कृणाल पंड्या यांनी त्याला पाठिंबा दर्शवताना राहुल वैद्यला इंस्टाग्रामवरून अनफॉलो केले. त्यामुळे हे प्रकरण आता मनोरंजन आणि क्रिकेट विश्वात अधिक गडद होताना दिसत आहे.एकंदरच, अवनीत कौरचा फोटो लाईक केल्यापासून सुरू झालेला हा वाद आता सोशल मीडिया चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. विराट कोहलीने दिलेल्या अल्गोरिथमच्या स्पष्टीकरणावर राहुल वैद्यने केलेली टीका आणि त्यानंतर चहल व कृणालचा विराटच्या बाजूने घेतलेला पवित्रा यामुळे ही घटना केवळ एक चुकून ‘लाईक’ न राहता, सेलिब्रिटींच्या जबाबदारीवर प्रश्न उपस्थित करणारी ठरली आहे.