बसस्थानकावर एटीएम सुविधा मिळणार

08 May 2025 19:14:21
नागपूर,
Ganeshpeth Bus Stand गणेशपेठ बसस्थानकावर येणार्‍या प्रवाशांच्या सुविधेसाठी लवकरच एटीएम केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. एसटीचा प्रवास करीत असताना अनेकवेळा पैश्यांची गरज निर्माण होते. तेव्हा एटीएम केंद्राचा शोध घेतल्या अशावेळी बराच वेळ जातो किंवा एसटी सुटण्याची वेळ निघून जाते. प्रवाशांना होत असलेला त्रास लक्षात घेवून राज्याचे परिवहन मंत्री तथा एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी एटीएम केंद्र सुरू करण्यास मान्यता दिली आहे.
 
 

Ganeshpeth Bus Stand  
२०४ बस स्थानकावर एटीएम केंद्र
नागपूर Ganeshpeth Bus Stand विभागातील सर्व बसस्थानकावर एटीएम केंद्र सुरू होणार असल्याने प्रवाशांना ठिकाणी भटकण्याची गरज पडणार नाही. नागपूरसह संपूर्ण राज्यातील २०४ बस स्थानकावर एटीएम केंद्र सुरू करण्यासाठी निविदा काढल्या जाणार आहे. एसटी महामंडळ आणि राष्ट्रीयकृत बँकेबरोबरच अन्य बँकांची एटीएम सुविधा घेण्यासाठी बसस्थानकावर जागा उपलब्ध करुन दिल्या जाणार आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण होताच पुढील तीन महिन्यात सर्व बसस्थानकावर बँकांची एटीएम सुविधा उपलब्ध आहे.
 
 
बस स्थानकांवर अद्ययावत सुविधा
 
 
मुख्यत:Ganeshpeth Bus Stand  गणेशपेठ येथील बसस्थानकावर दिवसभर प्रवाशांची वर्दळ असते. सध्याच्या घडीला सर्व बस स्थानके अद्ययावत सुविधा देण्यासाठी नियोजन केल्या जात आहे. महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळामार्फत विकास कामे करण्याचे नियोजित आहे. एसटी महामंडळातील महिला कर्मचार्‍यांना रात्री ८ नंतर कर्तव्य, अर्थात नाईट ड्युटी बंद करण्याचा घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केल्यानंतर आता एटीएम सुविधा देण्यासाठी निविदा काढण्याचे ठरविण्यात आले असल्याची माहिती एसटीचे प्रादेशिक व्यवस्थापक श्रीकांत गभणे यांनी दिली.
Powered By Sangraha 9.0