घोगली प्राथमिक शाळेतील उन्हाळी शिबिराचा समारोप

    दिनांक :08-May-2025
Total Views |
नागपूर,
Ghogali Primary School जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घोगली , केन्द्र वेळाहरी येथे  शालेय मुलांसाठी उन्हाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे दिपप्रज्वलन  माजी सदस्य मुकेश काळे यांनी केले .या सहा दिवसीय शिबिरात विविध प्रकारचे खेळ ड्रॉईंग , पैटींग , क्ले आर्ट , फनी गेम्स . भेटकार्ड ऑईल पेटींग हे सर्व मुलंकडून करून घेतले विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट सहभाग दर्शविला. शिक्षकांनी उत्तम मार्गदर्शन केले.
 
 
vara
 
 
समारोपीय दिनी प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते. विजेत्यांना बक्षीस देण्यात आले. यावेळी शाळा समिती अध्यक्षा कल्पना पटले , शिक्षणतज्ञ मधुकर ठाकरे माजी ग्रामपंचायत सदस्य सुनील रहाटे, प्रतिष्ठित नागरिक राम सेवतकर . जेष्ठ नागरिक वारेकर , लोखंडे , मेश्राम , पात्रे उपस्थित होते.Ghogali Primary School  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कांचन रामटेके यांनी केले व आभार प्रदर्शन मुख्याध्यापिका दुर्गा बाडबुधे यांनी केले .
सौजन्य:प्रतिभा वारेकर,संपर्क मित्र