कमी केसांचा त्रास? महिलांसाठी ‘हेअर विक’ ठरतंय हिट उपाय!

08 May 2025 12:52:47
Hair wig आजच्या घाईगडबडीत, ताणतणाव, हार्मोन्सचे असंतुलन, आणि अनियमित जीवनशैलीमुळे महिलांमध्ये केस गळतीचं प्रमाण झपाट्याने वाढत आहे. विशेषतः लहान वयातच डोक्यावर विरळपणा जाणवू लागतो आणि त्याचा थेट परिणाम आत्मविश्वासावर होतो. या समस्येवर उपाय म्हणून ‘हेअर विक’ ही पर्याय म्हणून महिलांमध्ये प्रचंड लोकप्रिय ठरत आहे.
 
 
Hair wig
 
पूर्वी फिल्मी दुनियापुरते मर्यादित असणारे हेअर विक आता सर्वसामान्य महिलांमध्येही सहज वापरले जात आहेत. हे विक नैसर्गिक केसांसारखेच दिसतात आणि विविध स्टाईल्स, लांबी, रंगांमध्ये उपलब्ध असल्याने सौंदर्य खुलवतात. यामुळे ऑफिस, पार्टी, लग्न समारंभ अशा कुठल्याही ठिकाणी महिलांना हव्या त्या लुकमध्ये सहज चमकता येतं.सहज लावता आणि काढता येण्यासारखी रचना,स्किन फ्रेंडली आणि नैसर्गिक लुक देणारी क्वालिटी,आत्मविश्वासात वाढ आणि सौंदर्य खुलवणारा परिणाम मिळेल. ‘विक’ हे आता केवळ सौंदर्यप्रसाधन नसून, अनेक महिलांसाठी आत्मविश्वास परत मिळवण्याचं साधन ठरत आहे. केस गळतीमुळे नैराश्य येणाऱ्या महिलांना हे एक सशक्त उपाय ठरत आहे.
 
 
 
१. लेस फ्रंट विक (Lace Front Wig):
यामध्ये पुढच्या बाजूला जाळी (लेस) असते, जी त्वचेशी चांगली जुळते. त्यामुळे केसांचा मुळापासून नैसर्गिक लुक येतो. पार्टी किंवा फॅशन लुकसाठी लोकप्रिय.
 
 
 
२. फुल लेस विक (Full Lace Wig):
संपूर्ण डोक्यावर लेस असते, त्यामुळे कुठल्याही बाजूने केस बांधता येतात. हे जास्त नैसर्गिक दिसते, पण किंमत तुलनेत अधिक असते.
 
 
३. मशीन्स मेड विक (Machine Made Wig):
मशीनद्वारे बनवलेले हे विक अधिक टिकाऊ असतात आणि किंमतीला स्वस्त. रोजच्या वापरासाठी उपयुक्त.
 
 
४. सिंथेटिक विक (Synthetic Wig):
नैसर्गिक केस नसून कृत्रिम फायबरपासून तयार केलेले. कमी किंमतीचे असते पण उष्णता सहनशक्ती कमी असते.
 
 
५. ह्युमन हेअर विक (Human Hair Wig):
खऱ्या केसांपासून बनवलेले, त्यामुळे अगदी नैसर्गिक दिसतात. स्टाइलिंग (स्ट्रेटनिंग, कर्लिंग) करता येते. किंमत जास्त असते पण टिकावू.
 
 
६. क्लिप-ऑन टॉपर्स / हाफ विक:
फक्त डोक्याच्या एका भागासाठी वापरतात – जसे की पुढचा भाग विरळ असताना. नैसर्गिक केसांमध्ये मिसळता येतात.
Powered By Sangraha 9.0