यवतमाळ,
Scholarship सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रतीवर्षी अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील मुलामुलींना परदेशात अध्ययन करण्यासाठी राजर्षी शाहू महाराज योजनेंतर्गत शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते. 2025-26 या शैक्षणिक वर्षात अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांना परदेशात विशेष अध्ययन करण्यासाठी या शिष्यवृत्ती योजनेत अर्ज सादर करण्यास 20 मे 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अ. या योजनेचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्तांनी केले आहे.