स्मिता जोशी जोहरे यांच्या 'तरंग 'कथासंग्रहाचे प्रकाशन

    दिनांक :08-May-2025
Total Views |
नागपूर,
Smita Joshi Johre स्मिता जोशी जोहरे यांच्या कथा या आदर्शवादी व संस्कारक्षम कथा आहेत. खेळाडू असलेल्या लेखिकेच्या व्यक्तिमत्वाचं प्रतिबिंब त्यांच्या कथांमधून दृष्टीस पडतं असे प्रतिपादन जेष्ठ कवयित्री व लेखिका मनिषा अतुल यांनी केले. त्या स्मिता जोशी जोहरे यांच्या 'तरंग' या कथासंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्यात अध्यक्षपदावरून बोलत होत्या. कथा संग्रहातील कथा या स्त्री केंद्रीत असून सहजतेने मन मोकळं करणाऱ्या व सकारात्मक आहेत, अत्यंत आशावादी आहेत. भविष्यात अत्यंत आदर्शवाद , मुल्याधिष्टीत आदर्श,व स्वपरिघापलीकडे जाऊन भविष्यात वास्तवदर्शी लेखनाची अपेक्षा मनिषा अतुल यांनी व्यक्त केली.कथेच्या पारंपारिक इतिहासाचा आढावा घेताना मनिषा म्हणाल्या की जागतिक कथांचा उगम हा भारतात झाला असल्याने भारत देशाला कथांची प्राचीन परंपरा लाभली आहे. पुराणातील 'सूर्य कथा' या कथांचे मूळ आहे असेही त्या म्हणाल्या.
 
 

varsha  
 
 
 
 
कथासंग्रहावर भाष्य करताना लेखिका जयश्री अंबासकर यांनी पुस्तकातील सर्व कथांचे सखोल विश्लेषण करत 'तरंग' कथासंग्रहाचे अंतरंग उलगडून दाखवले.Smita Joshi Johre  लेखिकेच्या मन:पटलावर उठलेल्या अनेक भावभावनांरुपी तरंगातून या कथांची निर्मित झाली असून त्या ओघवत्या शैलीतून हृदयाचा ठाव घेत आहेत, यातील कथा मानवी भावभावना, नातेसंबंध, त्यातील ताणेबाणे, जीवन जगण्याच्या विविध कसरती या साऱ्या पैलूंवर प्रकाश टाकत आनंद, समाधान शोधण्याचा कानमंत्र एकप्रकारे जगण्याची गुरुकिल्ली या कथा देतात.असे जयश्री अंबासकर म्हणाल्या.
याप्रसंगी 'तरंग' च्या लेखिका स्मिता जोशी जोहरे यांनी मनोगत व्यक्त करताना वृत्तबद्ध कविता ते कथा हा त्यांचा लेखनप्रवास व जीवन प्रवास उलगडला. समृद्ध जीवनाची सेकंड इनिंग जगताना त्यांनी निर्मिलेली शब्दफुले म्हणजे जीवनाची कृतार्थता असल्याचा भावही त्यांनी व्यक्त केला.Smita Joshi Johre याप्रसंगी तरंग कथासंग्रहातील 'कृतज्ञ' या कथेचे वाचन कवी तुषार जोशी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मोहिनी जोशी व वलय परिवाराने विशेष परिश्रम घेतले.यावेळी मंचावर प्रमुख वक्त्या म्हणून कवियत्री जयश्री अंबासकर, लेखिका स्मिता जोशी जोहरे, तसेच शोभा जोशी व कवी तुषार जोशी स्थित होते.
सौजन्य:वर्षा किडे /कुळकर्णी ,संपर्क मित्र