दपूम रेल्वे नागपूर विभागाची लक्षणीय कामगिरी

१६१.९६ कोटी रुपयांची कमाई

    दिनांक :08-May-2025
Total Views |
नागपूर,
South East Central Railway दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळाने एप्रिल महिन्यात माल लोडिंगमध्ये लक्षणीय बजावली आहे. या दरम्यानच्या काळात विभागाने १.७६ मिलियन टन माल लोड करून विभागाने १६१.९६ कोटी रुपयांची कमाई केली. मागील वर्षीच्या तुलनेत माल लोडिंगमध्ये २४.४ टक्के आणि मालभाड्यात ८.५ टक्के एवढी वाढ झाली आहे. यावर्षीच्या एप्रिलमध्ये सरासरी दररोज ८६९.९ वॅगन माल लोडिंग नोंदविण्यात आली. मागील वर्षीच्या तुलनेत २६.२ टक्के एवढी झालेली आहे.
 
 

South East Central Railway 
 
 
एप्रिल महिन्यात मेल-एक्सप्रेस गाड्यांच्या वेळा पाळण्याची टक्केवारी ८६.७४ एवढी राहिली, जी मागील वर्षीच्या तुलनेत ६८.२० टक्के एवढी वाढली आहे. दुसरीकडे याच काळात रेल्वे लाईनचे दुपदरीकरणासह तिसर्‍या आणि चौथ्या लाईनची निर्मितीच्या कामात देखील वेगाने प्रगती झाली आहे.
 
नागपूर मंडळांतर्गत लोडिंग पॉइंट व्यापाराच्या दृष्टीने अत्यंत लक्ष दिले जात आहे. प्रामुख्याने कोळसा, खाद्यान्न, डोलोमाईट लोखंड आदींचे लोडिंग केले जात आहे. व्यावसायिकतेला चालना देण्यासाठी गुड्स शेड्सचा सातत्याने विकास केला जात आहे. यासोबतच विश्रामगृह, शुद्ध पिण्याचे पाणी, कार्याच्या ठिकाणी स्वच्छता, शौचालय, पुरेशी प्रकाश व्यवस्था आणि सुरक्षितता याकडेही विशेष लक्ष दिले आहे.
 
 
प्रवाशांनी १.२१ कोटींची अनारक्षित तिकीट केली खरेदी
 
 
पूर्व मध्य नागपूर विभागात एप्रिल महिन्यात २.२ मिलियन प्रवाशांनी रेल्वेतून केला. या माध्यमातून विभागाला २६.८४ उत्पन्न मिळाले. विशेष म्हणजें गतवर्षीच्या एप्रिल महिन्यापेक्षा यावर्षी प्रवासी संख्या ४.७५ टक्के आणि उत्पन्न ५.२५ टक्के अधिक राहिले.विभागीय वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक दिलीप सिंग यांच्या मार्गदर्शनात एप्रिल महिन्यात वाणिज्य विभागाचे अधिकारी, तिकीट तपासणी कर्मचारी निरीक्षकांतर्फे तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत विनातिकीट बुक न करता सामनाची वाहतूक करणार्‍या ३२ हजार ९१० प्रवाशांवर कारवाई करीत १ कोटी ३५ लाख ८० हजार २४० रुपये दंड वसूल केला. रेल्वेगाडी व स्थानकावर धूम्रपान करणार्‍या ४६ प्रवाशांकडून ९ हजार २०० रुपये तर अस्वच्छता करणार्‍या ६४९ प्रवाशांकडून ६७ ८०० रुपये दंड वसूल करण्यात आला. प्रवाशांच्या सोयीसाठी तिकीट खरेदी करण्यासाठी ’यूटीएस’ मोबाइल अ‍ॅप सुविधा सुरू करण्यात आली आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून प्रवाशांनी एप्रिल महिन्यात १.२१ कोटी रुपयांची अनारक्षित तिकीट खरेदी केली. यासह दपूम रेल्वे नागपूर विभागाने एप्रिल महिन्यात १ हजार २४४ टन पार्सल लोडिंग करीत २५.४२ लाख उत्पन्न
 
 
रेल्वेच्या कर्मचार्‍यांना सावधानतेचा इशारा
 
 
भारतीय सैन्य दलाच्या एअर स्ट्राईकच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा भारतीय रेल्वे अधिकार्‍यांना फोन करून लष्करी वाहतुकीच्या विशेष गाड्यांच्या हालचालींबद्दल गोपनीय माहिती मागू शकते. त्यामुळे रेल्वेतील कर्मचार्‍यांनी सावधगिरी बाळगावी, असे आवाहन रेल्वे मंडळाने केले. याबाबत रेल्वे मंडळाने सर्व झोनच्या प्रमुखांना सूचित केले. रेल्वे ’मिल रेल कर्मचारी’ या रेल्वेच्या लष्करी शाखा व्यतिरिक्त कोणत्याही अनधिकृत व्यक्तीला माहिती देऊ नये, असे रेल्वे मंडळाने आपल्या संदेशात म्हटले आहे.
 
 
डिजिटल पेमेंटबाबत आंदोलन स्थगित
 
 
नागपूर जिल्ह्यातील पेट्रोल पंप चालकांनी १० मे पासून डिजिटल पेमेंट न स्वीकारण्याचा निर्णय घेतला त्यासाठी तयारीही सुरू करण्यात आली होती. परंतु रात्री उशिरा हवाई हल्ला झाला आणि त्यानंतर पंप चालकांनी त्यांचे आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. फेडरेशन ऑफ ऑल महाराष्ट्र पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष अतिम गुप्ता म्हणाले की, राष्ट्रीय हित प्रथम येते आणि परिस्थिती सामान्य होईपर्यंत आंदोलन पुढे ढकलण्यात येत आहे.
 
 
महाव्यवस्थापकांच्या हस्ते रेल्वे कर्मचार्‍यांना पुरस्कार
 
 
शिवाजी महाराज टर्मिनस, येथे झालेल्या एका समारंभात मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धर्मवीर मीणा यांनी १२ कर्मचार्‍यांना त्यांच्या अतुलनीय दक्षता, तत्पर कृती आणि ट्रेन संचालनातील सुरक्षा सुनिश्चित करण्याच्या कार्याबद्दल सुरक्षा पुरस्कार देऊन सन्मानित केले.प्रत्येक सन्मानित कर्मचार्‍याला पदक, प्रशस्तीपत्र, उत्कृष्ट सुरक्षा कायार्साठी गौरवपत्र आणि रोख रक्कम देण्यात आली. राम लखन सहायक आरपीएफ बल्लारशा आणि नितीन नाईक, हेड कॉन्स्टेबल (डॉग स्क्वाड), नागपूर यांनी पुरस्कार प्रदान करण्यात आले.
 
 
स्टेशनवर तक्रार निवारण शिबिर, विभागातील ४२ कर्मचार्‍यांचा सहभाग
 
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातर्फे नागपूर रेल्वे तक्रार निवारण शिबिराचे आयोजन करण्यात आले. हे शिबिर कर्मचार्‍यांचे कल्याण आणि संवाद सुधारण्याच्या विभागाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचा भाग होते. या शिबिरामध्ये ४२ कर्मचारी उपस्थित होते. शिबिरादरम्यान कामकाजाची परिस्थिती, कर्मचारी सुविधा आणि सेवा-संबंधित विषयांवर २७ तक्रारी प्राप्त झाल्या. यापैकी १४ तक्रारींचे निवारण तत्काळ करण्यात आले, जे विभागाच्या कर्मचारी-केंद्रित आणि सक्रिय दृष्टिकोनाचे आहे. शिल्लक तक्रारी काळजीपूर्वक नोंदवण्यात आल्या असून, त्या संबंधित विभागांकडे वेळेत सोडविण्यासाठी पाठवण्यात येत आहेत.