सुख-शांती-समाधान संस्थेचा १२ वा वर्धापन दिवस

08 May 2025 15:09:50
नागपूर,
Suresh Bhat Auditorium Reshimbagh सुख- शांती- समाधान संस्था नागपूरच्या वतीने रेशीमबाग येथे कविवर्य सुरेशभट सभागृहात शनिवार दिनांक १० मे रोजी, सायंकाळी ६ ते ९ या दरम्यान १२ व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. योगगुरू अध्यक्ष सचिन माथुरकर आणि सचिव शीला केळापुरे यांच्या नेतृत्वाखाली सुख- शांती-समाधान संस्थेचा १२ वा वर्धापन दिवस साजरा करण्यात येत आहे.प्रमुख अतिथी म्हणून दक्षिण नागपूरचे माजी आमदार तथा भारतीय जनता पार्टीचे नागपूर जिल्हा अध्यक्ष सुधाकर कोहळे आणि पगारिया ग्रुपचे संचालक उमेश पगारिया यांची प्रामुख्याने उपस्थिती राहणार आहे.
 
 
yoga  
 
 यावेळी दानामृत या विषयावर निबंध स्पर्धा आयोजित केलेली आहे.Suresh Bhat Auditorium Reshimbagh योगावर आधारित दानामृत या विषयावर संस्थेचे शिबिरार्थी डेमो सादर करतील कार्यक्रमाला जास्तीत जास्त मोठ्या संख्येने सहभागी होऊन सेवा करण्याची संधी द्यावी व सर्वांनी उपस्थित रहावे. या संस्थेत कार्यरत असलेले सदस्य यासाठी अथक परिश्रम घेत आहेत. असे आवाहन सचिव शिला केळापुरे यांनी केले आहे.
सौजन्य :देवराव प्रधान,संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0