VIDEO : पाकिस्तानातील लाहोरमध्येही अनेक स्फोट

    दिनांक :08-May-2025
Total Views |
लाहोर, 
Explosion in Lahore दहशतवादाला आश्रय देणाऱ्या पाकिस्तानच्या समस्या वाढत आहेत. आता पाकिस्तानातील सर्वात प्रसिद्ध शहर लाहोरमध्ये अनेक स्फोटांच्या बातम्या येत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हे स्फोट लाहोर विमानतळाजवळ झाले. पाकिस्तानी सैन्याने संपूर्ण परिसर सील केला आहे आणि परिसरात सायरनचा आवाज ऐकू येत आहे.
 

Explosion in Lahore 
 
पाकिस्तानच्या स्थानिक न्यूजने या स्फोटाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. Explosion in Lahore लाहोरमधील स्फोटाबाबत एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले आहे की विमानतळावर क्षेपणास्त्राने हल्ला करण्यात आला. स्फोटानंतर लाहोर विमानतळावर सायरनचा आवाज ऐकू आला आणि ते बंद करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे स्फोट लाहोरमधील वॉल्टन रोड परिसरात झाले.
सौजन्य  : सोशल मीडिया