संस्कार केंद्रात अग्निशामक दलाचे प्रात्यक्षिक

08 May 2025 16:31:04
नागपूर,
Vitthal Nagar Nagpur विठ्ठल नगर येथील कार्पोरेशन शाळेच्या प्रांगणात श्रीराम बाल संस्कार केंद्र विठ्ठल नगर द्वारा आयोजित व अग्निशामक दल सक्करदरा अमूल्य सहयोगाने Fire Safety विषयावर मार्गदर्शन व प्रात्यक्षिके करून दाखवले. याप्रसंगी मंचावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विठ्ठल नगरचे ज्येष्ठ स्वयंसेवक उमाकांत फडके, सेवाप्रमुख अमोल बोंदरे, गायत्री परिवार मधून यमेंद्र बिसेन, लाडिकर हनुमान मंदिराचे अध्यक्ष किशोर मेश्राम आणि सक्करदरा अग्निशमन दलाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. याशिवाय प्रात्यक्षिक बघण्याकरिता बालक बालिका, श्रीराम बाल संस्कार केंद्राचे सक्रिय कार्यकर्ते, विठ्ठल नगर येथील नागरिक व स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 

agni
 
 
 
  सुरुवातीला भारतीय सैन्याच्या विजयाचा जल्लोष व भारत माता की जय चे नारे दिले. यानंतर श्रीराम बालसंस्कार केंद्राने सर्व मान्यवरांचे व अग्निशामक दलाचे अधिकाऱ्यांचे स्वागत केले.Vitthal Nagar Nagpur ज्येष्ठ स्वयंसेवक उमाकांत फडके यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. यानंतर अग्निशामक दलाने माहिती दिली, प्रात्यक्षिके केली व करून घेतली आणि सर्वांच्या प्रश्नांची सकारात्मक उत्तरेसुद्धा दिली. आपात्कालीन स्थितीमध्ये अत्यंत उपयोगी अशी माहिती व प्रात्यक्षिके दाखविण्यात आली.या कार्यात अग्निशामक दल सक्करदरा,राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विठ्ठल नगर व सेवा विभाग, गायत्री परिवार व श्रीराम बाल संस्कार केंद्राचे सक्रिय कार्यकर्ते, लाडीकर हनुमान मंदिर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
सौजन्य:अमोल बोंदरे ,संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0