मुंबई,
Deepika Padukone बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण सध्या तिच्या आईत्वाचा आनंद घेत आहे. सप्टेंबर २०२४ मध्ये दीपिकाने 'दुआ' या गोंडस मुलीला जन्म दिला. आई झाल्यानंतर तिने काही काळासाठी चित्रपटसृष्टीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, आता ती हळूहळू कामाकडे परतत आहे.
अलिकडेच Deepika Padukone एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत दीपिकाने तिच्या मातृत्वाच्या अनुभवांबद्दल आणि आयुष्यात झालेल्या बदलांबाबत मोकळेपणाने सांगितले. ती म्हणाली, "मला माहित नाही की माझ्या मुलीच्या जन्मापूर्वी जसे काम होते तसेच पुढे चालू राहील की नाही. आणि मला पुन्हा तसेच काम करायचे आहे की नाही, हेही मला Deepika Padukone माहित नाही. आता पुढे काय होते ते पाहूया."दीपिका पुढे म्हणाली, "मला आता अशा प्रोजेक्ट्सवर काम करायचं आहे, जे मला वेळेचे योग्य नियोजन करू देतील आणि त्यामुळे मी माझ्या मुलीसोबत अधिक वेळ घालवू शकेन."तिच्या मुलीपासून दूर जाताना ती कशी भावना अनुभवते, यावर दीपिका म्हणाली, "जेव्हा मी दुआला घरी सोडते आणि कामावर जाते, तेव्हा मला आतून विचित्र वाटतं. कदाचित ही भावना प्रत्येक आईला होते आणि ती अगदी नैसर्गिक आहे."
प्रशंसा होती
अनुभव Deepika Padukone सांगतांना दीपिका म्हणाली "एकदा एका दिग्दर्शकाला माझ्याशी भेटायचं होतं, पण मी नकार दिला कारण मी त्या वेळी माझ्या मुलीसोबत होते. यावर त्या दिग्दर्शकाने म्हटलं, 'अरे, तू तर आईपण खूपच गांभीर्याने घेत आहेस.' मला आजही माहित नाही की ती प्रशंसा होती की टोमणा. पण मला वाटतं की आईत्व गांभीर्याने घेण्यात काहीही चूक नाही."कामाच्या आघाडीवर बोलायचे झाले, तर दीपिका शेवटची रोहित शेट्टीच्या ‘सिंघम अगेन’ या चित्रपटात डीसीपी शक्ती शेट्टीच्या भूमिकेत दिसली होती. यानंतर ती ‘किंग’ आणि ‘स्पिरिट’ या दोन मोठ्या चित्रपटांमध्ये झळकणार आहे.